28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रसवलत योजना पावली ; नाशिक मनपाची पावणेचार कोटी वसुली

सवलत योजना पावली ; नाशिक मनपाची पावणेचार कोटी वसुली

महापालिकेच्या मालमत्ता कर सवलत योजनेला बंपर प्रतिसाद लाभला असून पहिल्या तीन दिवसात तीन कोटी ७७ लाखांचा भरणा नागरिकांनी केला. तब्बल ३८ हजार मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेत आठ टक्के सूट पदरात पाडली. पुढिल तीन महिने ही सवलत योजना लागू राहणार असून नाशिककरांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.मागील संपुष्टात आलेल्या आर्थिक वर्षात करसंकलन विभागाने रेकाॅर्डब्रेक २०६ कोटी मालमत्ता कर वसूल केला होता. ही कामगिरी पाहता आयुक्तांनी यंदा गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के मालमत्ता कर वसुलीचे उदिष्ट वाढवून दिले आहे.(The discount scheme was implemented ; Nashik Municipal Corporation recovers Rs 4.5 crore )

महापालिका नियमित करदात्यांना प्रोत्साहन म्हणून दरवर्षी सवलत योजना राबवते. त्यात एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरल्यास बिलाच्या एकूण रक्कमेच्या आठ टक्के सूट दिली जाते. बिल आॅनलाईन भरले तर दहा टक्के सूट मिळते. मे महिन्यात पाच व जून महिन्यात तीन टक्के सूट मिळते. या योजनेमुळे अनेक नागरिक बील अदा करुन सवलत पदरात पाडून घेतात. गतवर्षी पहिल्या तीन महिन्यात नव्वद कोटींचा भरणा होत नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. यंदाही या योजनेला जबरदस्त प्रतिसाद लाभला आहे. १ ते ३ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत तब्बल ३८ हजार ७११ करदात्यांनी मालमत्ता कर भरुन सुट पदरात पाडून घेतली. तब्बल तीन कोटी ७७ लाख इतका कर मालमत्ता कराचा मनपाच्या तिजोरीत भरणा झाल‍ा आहे. त्यात पंचवटी विभाग अाघाडीवर असून त्या खालोखाल नाशिक पश्चिम विभागात सर्वाधिक मालमत्ता कराचा भरणा झाला आहे. तीस एप्रिलपर्यंत नागरिकांना आठ टक्के सुटचा लाभ घेता येणार आहे. मे महिन्यात पाच व जून महिन्यात तीन टक्के सूट मिळते. या योजनेमुळे अनेक नागरिक बील अदा करुन सवलत पदरात पाडून घेतात. गतवर्षी पहिल्या तीन महिन्यात नव्वद कोटींचा भरणा होत नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. यंदाही या योजनेला जबरदस्त प्रतिसाद लाभला आहे. मे महिन्यात पाच व जून महिन्यात तीन टक्के सूट मिळते.
विभागनिहाय आकडेवारी

विभाग भरणा लाभार्थी
सातपूर – ३४ लाख ८० हजार ३७२२
नाशिक पश्चिम – ७३ लाख ९३ हजार ३७१९
नाशिक पूर्व – ६५ लाख ५७ हजार ८२९३
पंचवटी – ८० लाख ९१ हजार ३८६४
नवीन नाशिक – ६७ लाख ८६ हजार ११९९३
नाशिक रोड – ५४ लाख २ हजार ७२००

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी