33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्राईम नाशिकरोड, देवळालीसह सिडको, सातपूरमध्ये शस्त्रांचा शोध

 नाशिकरोड, देवळालीसह सिडको, सातपूरमध्ये शस्त्रांचा शोध

सणोत्सवांसह आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ २ अंतर्गत बेकायदा शस्त्र < weapons > बाळगणाऱ्यांचा पोलीस ठाणेनिहाय शोध घेतला जात आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या १० वर्षांपासून कार्यरत असलेल्या गुन्हेगारांची घरझडती घेतली जात असून, नागरिकांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांची नावे निर्भयपणे कळवावीत, असे आवाहन पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसह गुढीपाडवा, रमजान ईद व रामनवमी हे सणोत्सव चालू महिन्यात साजरे होणार आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या सर्वच पोलीस ठाणेनिहाय बेकायदा शस्त्रसाठ्यांचा शोध घेतला जात आहे.अंबडचे सहायक आयुक्त शेखर देशमुख व नाशिकरोड विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या देखरेखीखाली दि. १ एप्रिलपासून ही मोहीम हाती घेण्यात आली.(Nashik Road, Deolali, Cidco, Satpur search for weapons)

लोकसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी परवानाधारकांना शस्त्र जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिलेले आहेत. त्यानुसार ४८७ एकूण शस्त्र परवानाधारकांपैकी ३१७ जणांनी आपापल्या हद्दीतील पोलिस ठाण्यात शस्त्र जमा केलेली आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्च रोजी दुपारी लागताच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहेत. लवकरात लवकर शस्त्र परवाने पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश पारीत करण्यात आले होते. याकामी जिल्हा आणि पोलिस प्रशासन झाडून कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी यांनी बैठकांचे सत्र सुरू केलेले आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे हेदेखील कोठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सूक्ष्म नियोजन आखत आहेत. निवडणूक काळात राजकीय वादविवाद, पूर्व वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची संयुक्त समिती पिस्तूल, रायफल व इतर अग्निशस्त्र जमा करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करीत आहे. यात केवळ बँका आणि अतिमहत्त्वाच्या सुरक्षा वगळून इतर परवानाधारकांकडील शस्त्र जमा करून घेण्यात येतील, असे आदेश पारीत करण्यात आले होते. कुठल्याही स्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शहरासह ग्रामीण भागात बारकाईने वॉच ठेवण्यात येत आहे.

अवैध शस्त्रांचा शोध सुरू
अवैध शस्त्र बाळगून निवडणुकीच्या काळात मतदारांना धमकी देणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अवैध शस्त्र शोध मोहीम पोलिसांकडून काही दिवसांपासून हाती घेतली गेली असून, प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत शोध घेण्यात आदेश पारीत झाले आहेत. बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

रेकार्डवरील आरोपींवरपीं प्रतिबंधात्मक कारवाई
जिल्ह्यातील काही गुन्हेगारी वृत्तीचे, रेकॉर्डवर असलेल्या गुंडांवर आता बारकाईने लक्ष दिले जाणार आहे. दारूची तस्करी करणाऱ्यांना पकडले जाणार आहे. साक्री तालुक्यातील सीमा हद्दीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कारवाई करून लाखोंचा खों दारूसाठा जप्त केलेला आहे. दारू माफियांसह मटका, जुगार व इतर अवैध धंदे करणाऱ्यांवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानंतर प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुंडांना बोलावून चांगलीच
तंबी देण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. वेळोवेळी त्यांना पोलिसांकडून डोसदेखील दिला जात आहे.

पोलीस ठाणेनिहाय गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारांच्या घरांची झडती घेतली जात आहे. ही मोहीम दि. ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून, नागरिकांनी निर्भयपणे शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन उपायुक्त राऊत यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी