31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईमदेवस्थान त्रेंबकेश्र्वरला लौजिंगचा विळखा

देवस्थान त्रेंबकेश्र्वरला लौजिंगचा विळखा

त्र्यंबकरोडवरील लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायामुळे एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. या लॉजिंगचा ( lousing) गैरवापर शाळकरी विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत केला जातो. या लॉजिंगमुळे परिसरातील शाळा, महाविद्यालयातील मुलींनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trembakeshwara) तीर्थस्थानाकडे जाणार्‍या रस्त्यात सध्या ३०० लॉजिंग सुरू आहेत. यातील बहुसंख्य लॉजिंग अनधिकृत आहेत. काही लॉजिंगवर अनैतिक व्यवसाय सुरू असतोच; शिवाय शाळकरी मुलेदेखील या लॉजिंगचा वापर अनैतिक बाबींसाठी करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अत्यल्प दरात अगदी तासाभरासाठीही सहजरित्या लॉजिंग उपलब्ध होत असल्याने अनैतिक संबंधांसाठी अनेक जोडपी या ठिकाणी येतात. परिणामी त्र्यंबकेश्वरच्या धार्मिकतेला गालबोट लागत आहे.(Shrine Trembakeshwara hit by lousing)

१२ ज्योतिर्लिंगांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे तीर्थक्षेत्र म्हणून त्र्यंबकेश्वराची ओळख आहे. जगभरातील भाविक त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. कुंभमेळ्याच्यादृष्टीनेदेखील महत्त्वाचे स्थान असल्याने त्र्यंबकेश्वरला विशेष महत्त्व आहे. असे असताना त्र्यंबकरोडवरील अनधिकृत लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे त्र्यंबकरोड बदनाम होत आहे.
भाविकांच्या राहण्याच्या सोयीकरिता लॉजिंग बांधल्याचा बनाव करत अनेक लॉजमालकांनी अनैतिक व्यवसाय सुरू केल्याचे वास्तव समोर आले आहे. कमी कालावधीत भरपूर पैसा मिळत असल्याने या परिसरात लॉजिंगची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकट्या त्र्यंबकरोडवर आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल ३०० हून अधिक लॉजिंग असून, अगदी डोंगराच्याआड बाजूला कानाकोपर्‍यातसुद्धा लॉजिंग बांधल्याचे दिसून येत आहे. या लॉजिंगच्या बांधकामाची रचना अगदीच संशयास्पद असल्याने येथे सुरू असलेले गैरप्रकार सर्वसामान्यांच्या अगदी सहजपणे लक्षात येत नाही.

सर्वात गंभीर बाब म्हणजे त्र्यंबक रस्त्यावरील शाळकरी मुलामुलींना लॉजिंग अगदी सहजतेने उपलब्ध होतात. परिणामी या ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वावर वाढलेला दिसतो. त्यामुळे परिसरातील पालकांची चिंता अधिक वाढली आहे. त्र्यंबक रस्त्यावर शाळा-महाविद्यालयांची संख्याही मोठी आहे. या महाविद्यालयांमध्ये देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणाच्या नावाखाली चंगळवाद करत असून, विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळेदेखील लॉजिंग वाढल्याचे बोलले जात आहे. ज्या यंत्रणेने यावर नियंत्रण ठेवायचे आहे त्यातील काही जणांची या व्यवसायात छुपी भागीदारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तक्रारदारांना दमदाटी त्र्यंबक रस्त्यावरील लॉजिंगमधील गैरप्रकार थांबावेत, यासाठी त्र्यंबक परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी व आंदोलने केली. मात्र, या नागरिकांना काही लॉजधारकांकडून दमदाटी करण्यात आली. तसेच, जीवे मारण्याच्या धमक्यादेखील दिल्या जात आहेत. त्यामुळे लॉजचालकांविरोधात आवाज उठवण्यास कोणीही धजावत नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी