31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeक्राईमबांधकाम साइटवर भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली चार मजूर दबले; दोघांचा मृत्यू

बांधकाम साइटवर भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली चार मजूर दबले; दोघांचा मृत्यू

येथील गंगापुररोडवरील शारदानगर भागात एका भुखंडावर सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकामाच्या ठिकाणी (construction site) तळमजल्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात आठ दिवसांपुर्वी बांधलेली भिंत सोमवारी (दि.८) सकाळी कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखाली चौघे मजूर दबले गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. गोकुळ संपत पोटिंदे (२८), प्रभाकर काळू बोरसे (३७,दोघे रा. दरी गाव) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे आहेत. गंगापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शारदानगर भागात भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा तानाजी आहेर यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू होते. तळमजल्याच्या उभारणीसाठी खोल खड्डा खोदण्यात आलेला होता. याठिकाणी भिंतीचे बांधकाम करण्यात येत होते.(Four labourers were buried under the debris after a wall collapsed at the construction site; Two deaths)

गंगापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शारदानगर भागात भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा तानाजी आहेर यांच्या बंगल्याचे बांधकाम सुरू होते.सहा बांधकाम मजूर खड्ड्यात उतरून भिंत बांधत असताना साधारणत: चार ते पाच दिवसांपूर्वी बांधलेली एका बाजूची सुमारे दहा ते पंधर फूट उंचीची भिंत अचानकपणे खड्ड्यात कोसळली. यामुळे त्याठिकाणी असलेले चौघे मजूर त्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.घटनेची माहिती समजताच आजूबाजूला असलेल्या मजूरांनी व लोकांनी धाव घेत दाबले गेलेल्या मजुरांना तातडीने बाहेर काढून जवळच्या आनंदवली येथील श्री गुरूजी धर्मदाय रूग्णालयात उपचारासाठी हलविले. याठिकाणी गोकुळ व प्रभाकर यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. तसेच अनिल रामदास जाधव (३०,रा.दरी) व संतोष तुकाराम दरोगे (४५,रा.काळेनगर) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक तृप्ती सोनवणे यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदणी करत तपास सुरू केला असून मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे .

दोन मजुरांचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगाऱ्याखालील मजुरांना तातडीने बाहेर काढून तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून दोन मजुरांना मृत घोषित केले. गोकुळ संपत पोटिंदे (28), प्रभाकर काळू बोरसे (37,दोघे रा. दरी गाव) असे मृत मजुरांची नावं आहेत.

जखमींवर उपचार सुरु
तसेच अनिल रामदास जाधव (30,रा.दरी) व संतोष तुकाराम दरोगे (45,रा.काळेनगर) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गंगापुर पोलीस पुढील तपास करत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी