क्राईम

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण : आरोपी शिझान खानचा पासपोर्ट ‘या’ कारणामुळे पोलिसांनी केला परत

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिझान खान याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक झाली होती. त्यानंतर जामीनावर बाहेर आलेल्या शिझानने पोलिसांनी जप्त करण्यात आला होता. मात्र, त्याला आता तो परत करण्यात आला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार त्याला पासपोर्ट देण्यात आला आहे.

तुनिषा शर्मा या अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. तुनिषा आणि शिझान यांच्यात प्रेम संबंध होते. मात्र, शिझान हा तुनिषा हिला सतत त्रास देत होता, टाळत होता. त्यामुळे तुनिषा हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यापूर्वी लिहलेल्या चिट्टीत तिने शिझान याच्यामुळे आत्महत्या करत असल्याच म्हटलं होतं. याबाबत तुनिषा हिच्या घरच्यांच्या तक्रारी नंतर शिझान यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. त्याला अटक करण्यात आली. तो वीस दिवस कोठडीत होता. त्यानंतर काही अटीवर त्याला जामीन मिळाला. यावेळी त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जप्त करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा
छोटी मायरा घेतेय ‘लहान तोंडी मोठा घास’

कौन बड़ा है अब तक जंग जारी है; पंकजा मुंडे मामा प्रमोद महाजनांच्या आठवणीत भावूक

अदानीच्या मालकीच्या ‘एनडीटीव्ही’ सर्वेक्षणात भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष

आता शिझान याची ‘खतरो के खिलाडी -13’ साठी निवड झाली आहे. त्यासाठी त्याला परदेशात जायचं आहे. उपजीवेकीचा प्रश्न असल्याने त्याला पासपोर्ट आवश्यक होता. हा पासपोर्ट परत हवा असल्याने त्याने वसई कोर्टात अर्ज केला होता. तो अर्ज मंजूर करण्यात आला आहे. कोर्टाने त्याचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश आज पोलिसांना दिलेत. त्यामुळे आता शिझान याला परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तो आता खतरो के खिलाडी सिझन 13 मध्ये भाग घेऊ शकत आहे.

सुधाकर काश्यप

Recent Posts

नाशिक जळगाव जिल्ह्यातील आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण

भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे घरात झोपलेल्या आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण (baby abducted) झाल्यानंतर काही दिवसांतच अपहरण…

10 hours ago

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटी येथे हातगाडीला आग

सिडकोतील स्टेट बँक चौक चौपाटीत (State Bank Chowk Chowpatty) मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हातगाडीला लागलेली आग…

11 hours ago

नाशिक इगतपुरी तालुक्यात बालविवाह रोखण्यात यश

इगतपुरी तालुक्यात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह (child marriage) रोखण्यात बाल आयोगाला यश(Success in…

12 hours ago

मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड मार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात

मुंबई आग्रा महामार्गावर (Mumbai-Agra highway) चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण…

12 hours ago

उन्हाळ्यात गूळ खाण्याचे फायदे

गुळामध्ये ( jaggery) व्हिटॅमिन बी 12, बी 6, लोह, खनिजे आणि जीवनसत्वे असतात. आपली रोगप्रतिकारक…

12 hours ago

पिंपळगाव येथे महिन्याभरात सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याची उलाढाल ठप्प

एप्रिल महिन्यात पिंपळगाव बाजार समितीत सुमारे तीन लाख क्विंटल कांद्याचे (onions) आवक होत असते. महिन्याभरापासून…

12 hours ago