31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रकौन बड़ा है अब तक जंग जारी है; पंकजा मुंडे मामा प्रमोद...

कौन बड़ा है अब तक जंग जारी है; पंकजा मुंडे मामा प्रमोद महाजनांच्या आठवणीत भावूक


एकेकाळी प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे भाजपचे महाराष्ट्रातील दिग्गज नेते होते. प्रमोद महाजन यांच्या बहिनीसोबत मुंडे यांचा विवाह झाल्याने त्यांच्यात नातेसंबंध देखील होते. प्रमोद महाजन यांचा आज स्मृतीदिन. प्रमोद महाजनांच्या स्मृतीदिनी आज अनेकांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रमोद महाजन यांच्या आठवणीत पंकजा मुंडे यांनी देखील एक ट्विट केले असून त्यात प्रमोद महाजनांसोबतचा एक फोटो आणि शेर पोस्ट केला आहे. प्रमोद महाजन हे पंकजा मुंडे यांचे ‘मामा’ होते.

तुम नही साथ इसका “ग़म” और तुम हमारे थे इसका “ग़ुरूर” इनकी हमेशा लढाई होतीं है।…कौन बड़ा है अब तक जंग जारी है….आदरांजली प्रमोद मामा… उत्तम वक्ता कुशल राजनेता …. असे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. प्रमोद महाजनांच्या आठवणीत भावूक झालेल्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्यासोबतचा फोटो देखील या ट्विटमध्ये पोस्ट केला आहे.


तुम्ही सोबत नाही याचे दु:ख, आणि तुम्ही आमच्या सोबत होता याचा अभिमान याची नेहमीच लढाई होते. यामध्ये कोण मोठे याचेच युद्ध अजूनही सुरू आहे. असे म्हणत पंकजा मुंडे यांनी प्रमोद महाजन यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. एकेकाळी राज्यासह देशात प्रमोद महाजन हे भाजपचे अत्यंत प्रभावशाली नेते म्हणून पुढे आले होते. खुप कष्टातून त्यांनी आपला प्रवास दिल्लीपर्यंत नेला होता. महाराष्ट्रातील प्रभावी नेत्यांपैकी प्रमोद महाजन हे एक नाव त्यावेळी दिल्लीत चर्चेत असायचे. प्रमोद महाजन पंतप्रधान होतील अशी देखील चर्चा देशभरात होत असे, मात्र त्यांच्या हत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला.

हे सुद्धा वाचा

अदानीच्या मालकीच्या ‘एनडीटीव्ही’ सर्वेक्षणात भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष

अबब,सुरक्षा रक्षक एका दिवसात कमवायचा साढे तीन कोटी, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर, नवनाथ पडळकर यांच्याकडे चिटणीस पदाची जबाबदारी !

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांचा राजकीय संघर्ष सुरु झाला. पंकजा मुंडे यांची राजकीय अस्तित्वाची लढाई सुरु असून आज त्यांनी प्रमोद महाजन यांना अदरांजली अर्पण करताना अत्यंत भावनिक पोस्ट केली आहे. महाजन हे उत्कृष्ट वक्ता आणि कुशल राजकारणी होते असे देखील त्यांनी म्हटले आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या शाळेत राजकीय धडे गिरवलेल्या पंकजा मुंडे यांचा सध्या राजकीय अस्तित्वाचा संघर्ष सुरु आहे. अशात त्यांनी केलेल्या ट्विटची चर्चा सुरु आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी