31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeक्राईममहिलेने शेजाऱ्याच्या मुलाविरोधात पोक्सोची तक्रार दिली; भांडणात शेजाऱ्याने महिलेला गोळ्या घालून ठार...

महिलेने शेजाऱ्याच्या मुलाविरोधात पोक्सोची तक्रार दिली; भांडणात शेजाऱ्याने महिलेला गोळ्या घालून ठार मारले

शेजाऱ्यांच्या भांडातून एका महिलेला गोळी मारून ठार करण्यात आले आहे. ही घटना मानखुर्द पोलीस स्टेशनच्या हद्दीत मडाला येथे घडली आहे. मयत व्यक्तीच नाव फरझना शेख असे आहे. मानखुर्द, मडाला येथे इंदिरा नगर ही झोपडपट्टी वसाहत आहे. या वसाहतीत फरझना शेख आणि सूरज सिंह हे राहतात. फरझना शेख आणि सूरज सिंग यांच्या कुटूंबात गेल्या अनेक वर्षांपासून भांडणं आहेत. दोघांनी मानखुर्द पोलीस स्टेशन मध्ये एकमेकांविरोधात अनेक तक्रारी केल्या आहेत.

शनिवारी या दोन कुटुंबात पुन्हा भांडण झालं. यावेळी सूरज सिंह याने आपल्या जवळच्या कट्टा काढला. तो फरझना यांच्या छातीवर रोखला आणि तिच्यावर दोन गोळ्या झाडल्या. यात फरझना जागीच कोसळल्या. त्यांचं नातेवाईक त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच सूरज सिंग आणि इतर आरोपी पळून गेले. याबाबत मानखुर्द पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

फरझना आणि सूरज सिंग यांच्या कुटुंबात गेल्या अनेक वर्षा पासून तणाव होता. काही दिवसांपूर्वी सूरज सिंह यांच्या मुलाच्या विरोधात फरझना यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. आपल्या लहान मुलीचा लैंगिक छळ केल्याची फरझना यांची तक्रार होती. त्यानुसार सूरज सिंह यांच्या मुलाच्या विरोधात पोस्को कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात सूरज सिंग याचा मुलगा फरार आरोपी आहे.

हे सुद्धा वाचा 
मनुकुमार श्रीवास्तव कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकता, स्थितप्रज्ञता, सहनशीलता,अन् संयमाची शांत मूर्ती..!

मोदी सरकारविरोधात निखिल वागळे यांचे निर्भय बनो आंदोलन

संजय राऊतला मख्यमंत्री व्हायचे होते पण…एकेरी उल्लेख करीत नितेश राणेंचा राऊतांवर हल्ला 

ही तक्रार खोटी असल्याचं सूरज सिंह याच म्हणणं होतं. यामुळे तो चिडला होता. यातून त्याने देशी कट्टा आणला आणि त्याने फरझना यांच्यावर गोळीबार केला. सूरज सिंग हा गुन्हेगार स्वरूपाचा व्यक्ती आहे. त्याच्या विरोधात अनेक गुन्हे नोंद आहेत.अनेक खटले प्रलंबित आहेत. हल्ला केल्या नंतर सूरज आणि त्याचा मुलगा फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी 12 पथक बनवन्यात आली होती. त्या दोघांना कोकणात त्यांच्या नातेवाईक यांच्याकडे लपले होते. त्यांना आज अटक करण्यात आली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी