29 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeक्राईमअजब : 6 कोटी जनतेचा अपमान करणाऱ्या कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल!

अजब : 6 कोटी जनतेचा अपमान करणाऱ्या कुत्र्याविरोधात गुन्हा दाखल!

आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याविरोधात विजयवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एका भटक्या कुत्र्याने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी काही महिलांनी पोलिस ठाणे गाठत; संबंधित कुत्र्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचा आणि राज्यातील 6 कोट जनतेचा अपमान करणाऱ्या या कुत्र्याविरोधात कारवाई करा अशी अजब मागणी त्यांनी केली. दरम्यान ही तक्रार दाखल झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे. तसेच याप्रकरणी पोलीस नेमकी कशाप्रकारे कारवाई करतात? याकडेही सर्वसामन्यांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात एक भटका कुत्रा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांचे भिंतीवर लावलेले पोस्टर फाडताना दिसतोय. ही घटना आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा येथील आहे. याप्रकरणी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या दसारी उदयश्री यांनी विजयवाडा पोलीस ठाण्यात या कुत्र्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणवणाऱ्या दसारी उदयश्री यांनी उपहासात्मक पद्धतीने ही तक्रार दाखल केली आहे. काही महिलांना घेऊन त्या पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यांनी पोलिसांना सांगितलं की व्हायरल व्हिडिओत कुत्रा आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं पोस्ट फाडतो आहे त्यामुळे त्या कुत्र्याच्या विरोधात कारवाई करा.

मिडियाशी संवाद साधताना उदयश्री म्हणाल्या, जगनमोहन रेड्डी यांच्या विषयी माझ्या मनात खूप आदर आहे. त्यांचा पक्ष बहुमत मिळवून सत्तेवर आला. अशा मुख्यमंत्र्यांचं पोस्टर फाडून कुत्र्याने त्यांचा अपमान केला आहे. राज्यातील सहा कोटी जनतेचा या कुत्र्याने अपमान केला आहे. यामुळे या कुत्र्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असे दसारी उदयश्री म्हणाल्या.

संबंधित बातमीचा व्हिडिओ: 

women file police complaint against dog for tearing poster of andhra cm

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी