35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्रिकेटIPL 2023 : 'या' चुकीमुळे हार्दिक पांड्याला पडला 12 लाखांचा दंड!

IPL 2023 : ‘या’ चुकीमुळे हार्दिक पांड्याला पडला 12 लाखांचा दंड!

पंजाब किंग्स विरुद्धचा सामना सहज खिशात घालणाऱ्या गुजरात टायटन्सच्या आनंदावर विरजण घालणारी बातमी आली आहे.

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या गुजरात टायटन्स व पंजाब किंग्समधील सामना गुजरात टायटन्सनं तब्बल 6 गडी राखून खिशात घातला. या विजयानंतर गुजरातचे खेळाडू व पाठीराखे आनंद साजरा करत असतानाच आनंदावर विरजण घालणारी बातमी धडकली. आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पंजाब आणि गुजरात यांच्यातील हा सामना मोहालीमध्ये खेळला गेला. या सामन्यात पीबीकेएसनं प्रथम फलंदाजी करताना 153 धावा केल्या. 19.5 षटकांत गुजरातनं हे लक्ष्य पार केलं. मात्र, षटकांची गती कमी राखल्यानं हार्दिकला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

आयपीएलनं या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. 13 एप्रिल 2023 रोजी मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स संघाला अपेक्षित गतीनं षटकं टाकता आली नाहीत. त्यामुळं सीझनमधील पहिल्या चुकीसाठी कर्णधार हार्दिक पंड्या याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, असं पत्रकात म्हटलं आहे.

गुजरात टायटन्सची ही पहिली चूक असल्यामुळं नियमानुसार कर्णधाराला दंड भरावा लागणार आहे. हीच चूक संघानं पुन्हा केल्यास कर्णधाराबरोबरच इतर खेळाडूंनाही दंड भरावा लागेल. तर, तिसऱ्यांदा ही चूक झाल्यास कर्णधारावर काही सामन्यांची बंदी येऊ शकते. त्यामुळं हार्दिक पंड्याला पुढील सामन्यांत काळजी घ्यावी लागणार आहे.

ही सुद्धा वाचा:

IPLच्या सामन्यांचे द्विशतक करणारा धोनी पहिला कर्णधार!

सामना जिंकूनही धोनीने दिली चेन्नईचे कर्णधारपद सोडण्याची WARNING!

IPL 2023: गरिबाच्या पोराची कमाल; 5 चेंडूंवर 5 षटकार मारत रिंकू ठरला KKRचा हिरो

यंदाच्या सीझनमध्ये गुजरात टायटन्स आतापर्यंत चार सामने खेळला असून तीन सामन्यांत विजय मिळवला आहे. हा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांनाही प्रत्येकी 6 गुण आहेत. मात्र, चांगल्या नेट रनरेटमुळे हे दोन्ही संघ गुजरातच्या पुढं आहेत. सध्या राजस्थान अव्वल तर लखनऊ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

IPL 2023, Hardik Pandya, GT Vs PBKS, IPL 2023: Hardik Pandya fined 12 lakhs

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी