33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeमुंबईCyclone Nisarga in Mumbai LIVE : हायअलर्ट जारी; निसर्ग चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीवर...

Cyclone Nisarga in Mumbai LIVE : हायअलर्ट जारी; निसर्ग चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीवर धडकणार; ‘या’ भागाला धोका?

टीम लय भारी

मुंबई : काही तासात निसर्ग चक्रीवादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या अगदी जवळ असल्याचे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. 

cyclone nisarga in mumbai
आयएमडीच्या माहितीचा उपयोग करून चक्रीवादळाचा संभावित मार्ग आखण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या मार्गाचा आयएमडीने काल रात्री साडेअकरा वाजता (१ जून रात्री ११:३० वाजता) प्रसारीत केलेल्या अद्ययावत अंदाजानुसार तीन जूनला दुपारी चक्रीवादळ मुंबईजवळ किनारपट्टी ओलांडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

निसर्ग चक्रीवादळ ३ जूनला दुपारी अलिबागजवळ जमिनीला धडकणार असल्याचे आयएमडीने जाहीर केले आहे. त्यानुसार अलिबाग ते मुंबई आणि उपनगरांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

Cyclone Nisarga

वा-याचा वेग आज पहाटेपासूनच वाढण्यास सुरुवात झाली आहे. दुपारनंतर हा वेग प्रति तास ८० ते ९० किलोमीटर असेल. ३ जून रोजी चक्रीवादळाचे स्वरूप अधिक तीव्र झाल्यानंतर हा वेग प्रति तास १२५ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

येत्या १२ तासात कधीही निसर्ग वादळ धडकण्याची शक्यता असल्याने कोणीही समुद्रकिनारी जाऊ नका, किना-याकाठच्या जनतेला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

Cyclone in Mumbai
‘या निसर्ग वादळाचा (Cyclone Nisarga) मुंबईवर परिणाम होईल’, अशी माहिती आयएमडीचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी दिली.

चक्रीवादळाच्या वादळाची सद्यस्थिती पाहता आयएमडीने म्हटले आहे की, पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये तयार झालेला दाबाचा पट्टा मुंबईच्या ५५० किमी, पणजीच्या ३०० किमी, सुरतच्या ७७० किमी दूर आहे. हवामान खात्याने चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेत रात्री अडीच वाजता ही माहिती दिली. मंगळवारी हवेच्या दाबाचा पट्टा आणखी वाढणार असल्याने जवळपास १२ तासाच्या आत समुद्रात तीव्र स्वरुपाचे चक्रीवादळ येणार आहे.

अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. ‘निसर्ग’ नावाचे हे चक्रीवादळ (Cyclone Nisarga) उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार असल्याची माहिती हवामान विभागाने (IMD prediction on Cyclone Nisarga) दिली.

‘या निसर्ग वादळाचा (Cyclone Nisarga) मुंबईवर (Cyclone in Mumbai) परिणाम होईल’, अशी माहिती आयएमडीचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी दिली. यामुळे मुंबई, ठाण्यासह पश्चिम किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यात मुंबईशिवाय ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या भागांचा समावेश आहे.

Cyclone Nisarga : मुंबईत तीन दिवसांत अतिमुसळधार पाऊस

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे निसर्ग चक्रीवादळात (Cyclone Nisarga) रूपांतर होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येत्या तीन दिवसांत मुंबईत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Cyclone in Mumbai
अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून चक्रीवादळही वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईत येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

धक्कादायक : या अभिनेत्रीसह कुटुंबियांना कोरोनाचा विळखा

निसर्ग वादळ आणि एनडीआरएफ पथकाची धावाधाव

मुंबई किनारपट्टीलाही या वादळाचा धोका असल्याने मुंबईसाठीही एनडीआरएफच्या तीन टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालघरसाठी दोन तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्गासाठी प्रत्येकी एक टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.

Cyclone Nisarga
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते.

हे वादळ उत्तर आणि उत्तरपूर्वेकडे आणि उत्तर महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात किना-याकडे रायगडमधील हरिहरेश्वर आणि दमनच्या पट्ट्यातून वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादळी सज्जतेसाठी मुंबईत आलेले एनडीआरएफचे एक पथक अलिबागला रवाना झाले. मात्र हे वादळ हरिहरेश्वरला धडकण्याची शक्यता असल्याने आता आणखी एक एनडीआरएफचे पथक तिकडे रवाना झाले आहे.

दरम्यान, २ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Cyclone Nisarga
‘निसर्ग’ नावाचे हे चक्रीवादळ (Cyclone Nisarga ) उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार असल्याची माहिती हवामान विभागाने (IMD) दिली.

विदर्भातही वादळी वा-यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. तर पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे.

सायक्लोन २ जूनपर्यंत होणार अधिक तीव्र

सायक्लोन २ जूनपर्यंत अधिक तीव्र होईल, असेही हवामान विभागाच्या संबंधित विभागाने सांगितले. ‘हे वादळ सुरुवातीला २ जून सकाळपर्यंत उत्तरेकडे कूच करणे अपेक्षित आहे. त्यानंतर उत्तर आणि उत्तरपूर्वेकडे आणि उत्तर महाराष्ट्रासह दक्षिण गुजरात किना-याकडे रायगडमधील हरिहरेश्वर आणि दमनच्या पट्ट्यातून वळण्याची शक्यता आहे. ही क्रिया ३ जून संध्याकाळी किंवा रात्री होईल, असे हवामान विभागाने सांगितले.

रायगड आणि दमन यामधील साधारणपणे २६० किमीचा पट्टा हा देशातील अत्याधिक लोकसंख्येच्या घनतेमध्ये येतो. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या क्षेत्रांचा यामध्ये समावेश होतो.

३ जूनला सायंकाळी या वादळाचा वेग १०५-११० किमी प्रति तास एवढा असेल, असेही आयएमडीने सांगितले. या काळात दक्षिण गुजरात आणि महाराष्ट्रातील किनारी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

वादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज

वादळाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजेच एनडीएमएच्या अधिका-यांसोबत तयारीचा आढावा घेतला. हे वादळ ३ जून रोजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये धडकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पूर्व तयारीसाठी आतापासूनच सुरुवात केली आहे.

अमित शहांनी केली उद्धव ठाकरेंशी चर्चा

मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ काँफ्रंसिंगच्या माध्यमातून बातचीत केली. यामध्ये राज्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. एनडीआरएफचे महासंचालक एसएन प्रधान यांनी सांगितले, चक्रीवादळ निसर्गमुळे ताशी 90-100 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे, महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर असलेल्या लोकांना दूर नेण्यात आले आहे.

अरबी समुद्रात वादळाची स्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफने महाराष्ट्रात एकूण ९ तुकड्या तैनात केल्या आहेत, ज्यापैकी मुंबईत ३, पालघरमध्ये २, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक तुकडी तैनात करण्यात आल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

शाहांना ‘आत्मनिर्भर’ बोलताही आले नाही; ते देशाला आत्मनिर्भरता शिकवू शकतात का? काँग्रेसचा सवाल!

VidhanParishad 12 seats appointment : धनगरांना भाजपचा आसरा, महाविकास आघाडीकडून मात्र काणाडोळा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी