30 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रCyclone Nisarga : निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररुप, कोकणात तांडव!

Cyclone Nisarga : निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररुप, कोकणात तांडव!

टीम लय भारी

मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ (Cyclone Nisarga) कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दापोली, मंडणगडहून अलिबाग किनारपट्टीजवळ पोहचले आहे. अनेक भागात मोठमोठी झाडे उन्मळून पडली असून आज दुपारी निसर्ग चक्रीवादळ मुंबईला धडकण्याची (Cyclone Nisarga hits Mumbai) शक्यता आहे.

संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात परिसरात ताशी 120 किमी वेगाने वारे वाहत आहेत. तसेच, मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे.

Cyclone Nisarga
‘निसर्ग’ चक्रीवादळ (Cyclone Nisarga) कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दापोली, मंडणगडहून अलिबाग किनारपट्टीजवळ पोहचले आहे. अनेक भागात मोठमोठी झाडे उन्मळून पडली आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर रायगडमधील गोरेगावजवळील लाख पाले गावाच्या हद्दीत महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

निसर्ग चक्रीवादळाच्या (Cyclone Nisarga) पार्श्वभूमीवर प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ देऊन मुंबईसह किनारपट्टी भागात संचारबंदी जारी केली आहे. तसेच, किनारपट्टीच्या विविध भागात एनडीआरएफच्या 20 तुकड्या तैनात केल्या आहेत. मुंबईत आठ, रायगडमध्ये पाच, पालघरमध्ये दोन, ठाण्यात दोन, रत्नागिरीत दोन आणि सिंधुदुर्गात एनडीआरएफची एक तुकडी तैनात असणार आहे. एनडीआरएफच्या एका रेस्क्यू टीममध्ये 45 जवानांचा समावेश आहे.

मुंबईत समुद्राला उधाण, नाले तुडूंब भरल्याने पाणी झोपडपट्ट्यांमध्ये घुसले, नालेसफाईवर प्रश्नचिन्ह

 

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून पूर्वतयारी करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याची पाहणी केली. चौपाट्यांवर महापालिकेने केलेली तयारी प्रत्यक्ष पाहून मुंबईकरांनी महापालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करावे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Nisarga) रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वा-यासह मुसळधार पाऊस पडत आहे. रत्नागिरीतील 3 तालुक्यात रात्रीपासून वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मंडणगड, गुहागर, दापोली तालुक्यास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. जिल्हाधिका-यांकडून संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.

Cyclone Nisarga : हायअलर्ट जारी; निसर्ग चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीवर धडकणार; ‘या’ भागाला धोका?

या चक्रीवादळाने (Cyclone Nisarga) अरबी समुद्रामध्ये उत्तरेच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. त्यामुळे रायगडमधील अलिबाग येथे लॅन्डफॉल होण्याची शक्यता आहे. तर अलिबागचा दक्षिणेकडील भाग हे चक्रीवादळ दुपारी 1 ते 3 च्या दरम्यान पुढे सरकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मि-या समुद्रात नांगर तुटल्याने जहाज भरकटले; काही खलाशी अडकल्याची भीती

रत्नागिरीतील मि-या समुद्रात जहाजाचा नांगर तुटल्याने नर्मदा सिमेंटचे जहाज भरकटले आहे. जहाजाला समुद्र किना-याजवळ आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या रत्नागिरी, मालगुंड, जाकादेवी, पूर्णगड, पावस, हेदवी या भागात वा-यांचा वेग ९० किमीपेक्षा जास्त आहे. तर जयगड किना-यावर हा वेग ११० इतका आहे. संगमेश्वर कोयनापर्यंत वा-याचा वेग सध्या ९० किमीपेक्षा जास्त आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड किनारपट्टीवरील वा-याचा वेग ताशी १२० किमीपेक्षा जास्त आहे.

मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत हाय अलर्ट

मुंबई प्रथमच भीषण वादळाच्या तडाख्यात येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या सायक्लोन ई-अॅटलासनुसार १८९१ नंतर प्रथमच महाराष्ट्राच्या किनारी भागात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी १९४८ आणि १९८० मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती, मात्र तेव्हा ती चक्रीवादळात बदलली नव्हती.

Cyclone Nisarga : मुंबईत पाऊस, बीकेसीच्या कोविड सेंटरला चक्रीवादळाचा धोका; रुग्णांना हलवले!

मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांत हाय अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या ७ जिल्ह्यांना वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, महाराष्ट्रात ४ जूनपर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी