33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रVidhanParishad 12 seats appointment : धनगरांना भाजपचा आसरा, महाविकास आघाडीकडून मात्र काणाडोळा

VidhanParishad 12 seats appointment : धनगरांना भाजपचा आसरा, महाविकास आघाडीकडून मात्र काणाडोळा

टीम लय भारी

मुंबई : विधानपरिषदेच्या 12 जागांच्या नियुक्त्या लवकरच होऊ घातल्या आहेत ( VidhanParishad 12 seats appointments in June 2020 ). त्या पार्श्वभूमीवर धनगरांसाठी ‘महाविकास आघाडी’ बरी की, भाजप असा सूर समाजातून उमटू लागला आहे.

येत्या 6 जून रोजी विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त होत आहेत. या 12 जागांपैकी दोन जागांवर धनगर आमदार कार्यरत होते. त्यामुळे या दोन्ही जागा पुन्हा धनगरांनाच मिळायला हव्यात. किंबहूना, शिवसेनेनेही एक जागा धनगरांना द्यायला हवी. तिन्ही पक्षांनी मिळून तीन जागा धनगर समाजाला द्यायला हव्यात, असा सूर धनगर समाजातून व्यक्त केला जात आहे.

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाने सन 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला भरभरून पाठिंबा दिला होता. पण भाजपला आरक्षणाचा शब्द पूर्ण करता आला नाही. मात्र, भाजपने राम शिंदे व महादेव जानकर यांच्या रूपाने राज्यात धनगर समाजाला दोन कॅबिनेट मंत्रीपदे दिली. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डॉ. विकास महात्मे यांच्या रूपाने धनगर समाजाला राज्यसभेची खासदारकी दिली ( BJP has given two ministers and an MP to Dhangars ).

Devendra Fadnavis
जाहिरात

धनगर आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या याचिकेत ‘धनगर व धनगड’ एकच आहे असे प्रतिज्ञापत्र भाजप सरकारने दिले होते. अनुसूचित जमातीला लागू असलेल्या सगळ्या योजना धनगरांनाही लागू करण्याचा आदेश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जारी केला होता.

फडणवीस सरकारने सोलापूर विद्यापीठाचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असे केले.

नुकत्याच नऊ जागांसाठी पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने गोपीचंद पडळकर यांना एक आमदारकी ( BJP has given one VidhanParishad membership to Dhangar community ) दिली. ‘महाविकास आघाडी’च्या वाट्याला पाच जागा होत्या, तरीही एकाही धनगराला संधी दिली नाही.

हे सुद्धा वाचा

MLC Appointment: धनगर आमदारांच्या दोन जागा रिक्त, नव्याने कुणाला संधी मिळणार ?

धनगर समाजासाठी अजितदादांकडे १ हजार कोटींची मागणी; धनगर शिष्टमंडळाचा आग्रह, आरक्षणाबाबतही दिले आश्वासन

सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आरक्षणाचा शब्द पाळला नाही, म्हणून धनगर समाजाने ‘महाविकास आघाडी’ला साथ दिली होती. पण सत्तेवर येताच ‘महाविकास आघाडी’चे नेते धनगर समाजाला विसरून गेल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

विधानपरिषदेच्या नऊ जागांवर एकाही धनगर नेत्याला महाविकास आघाडीने संधी दिली नाही. आता राज्यपालांकडून ( Governor will appoint 12 VidhanParishad members )  नियुक्त करावयाच्या 12 जागांपैकी तीन जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी किमान एका उमेदवाराला संधी द्यायला हवी, असा सूर उमटत आहे.

गोपीचंद पडळकरांमुळे धनगर समाज पुन्हा भाजपकडे

गोपीचंद पडळकर यांची धनगर समाजात मोठी ताकद आहे. आरक्षणामुळे धनगर समाज भाजपवर नाराज होता. त्यामुळे धनगरांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना आमदार बनविले. पडळकरांना आमदारकी दिल्यामुळे धनगर समाजात पुन्हा एकदा भाजपबद्दल आत्मियता निर्माण झाली आहे.

Mahavikas Aghadi

… तर धनगर ‘महाविकास आघाडी’पासून दूर जातील

विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी दोन ते तीन जागा धनगरांना मिळतील अशी अपेक्षा आहे. धनगरांना संधी मिळाली नाही, तर धनगर समाजाची मोठी व्होट बँक ‘महाविकास आघाडी’च्या हातून जाईल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

धनगर समाजामध्ये अनेक नेते

भारतीय राज्य घटनेतील तरतूदीनुसार कला, साहित्य, विज्ञान, सहकार या क्षेत्रातील लोकांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात येते. परंतु गेली कित्येक वर्षे ही तरतूद धाब्यावर बसविली आहे. या जागांवर राजकीय नियुक्त्याच केल्या जातात.

मात्र विद्यमान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे ‘महाविकास आघाडी’ सरकारला सतत धारेवर धरतात. त्यामुळे ते यावेळी राजकीय नियुक्त्या होऊ देणार नाहीत असे बोलले जात आहे.

VidhanParishad 12 seats appointment : धनगरांना भाजपचा आसरा, महाविकास आघाडीकडून मात्र काणाडोळा

भारतीय राज्य घटनेतील या तरतुदीनुसार सुद्धा अनेक मान्यवर व्यक्ती धनगर समाजात आहेत. बाजीराव पाटील – खेमणर हे जवळपास 40 वर्षांपासून सहकार चळवळीत आहेत. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या अमृतवाहिनी सहकारी दुध संघाचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. सहकारी साखर कारखाना, सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. अजूनही ते अनेक संस्थांमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. उत्तम जानकर हे सुद्धा चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. सेन्सॉर बोर्डावरही ते सध्या आहेत.

साहित्य, कला, विज्ञान, सहकार या क्षेत्रातील भरपूर उमेदवार धनगर समाजात उपलब्ध आहेत. फक्त त्यांना आमदारकी देण्याची इच्छाशक्ती ‘महाविकास आघाडी’तील तिन्ही पक्षांकडे नाही. या उलट भाजपने अनेकदा अनपेक्षितपणे धनगर समाजाला मोठ्या मनाने प्रतिनिधीत्व दिले आहे. आघाडीच्या तिन्ही पक्षांनीही आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून द्यायला हवा, अशी भावना समाजातून व्यक्त होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी