33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयसाताऱ्यातील मिलिटरी गावाचा इतिहास जगासमोर येणार, मंत्री दादा भुसे यांचा निर्णय

साताऱ्यातील मिलिटरी गावाचा इतिहास जगासमोर येणार, मंत्री दादा भुसे यांचा निर्णय

टीम लय भारी

मुंबई : माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात माजी सैनिक कल्याण विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील सैनिकी परंपरा लाभलेल्या अपशिंगे गावाच्या विकासासाठी समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले (Dada Bhuse decided to portray The history of the military village in Satara).

अपशिंगे (मिलिटरी) गावाचा इतिहास संपूर्ण जगासमोर आणण्याच्या दृष्टीने संग्रहालय निर्मिती व त्या अनुषंगाने प्रस्तावित पायाभूत सुधारणा सुचविण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात येणार आहे. या  समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार अपशिंगे गावाचा विकास करण्यात येईल.

अवैध दारू व ताडी वाहतुकप्रकरणी दोघेजण ताब्यात

फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यांना बाधा

पहिल्या महायुद्धाच्या काळात या गावातील ९० टक्के लोक सैन्यात सहभागी झाले होते. या गावाने अनेक वीर सैनिक दिले. त्याचा इतिहास जतन करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच संग्रहालयाची निर्मिती, ग्रंथालय, स्टेडियम प्रशिक्षण संस्था व पायाभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात. त्यासाठी जागेची पाहणी करावी. कृषी विभागाच्या वतीने तेथील शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा असे निर्देशही भुसे यांनी दिले.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे सैन्यभरती बंद होती, ती पुन्हा सुरू करावी म्हणून  राज्यात विविध ठिकाणी सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडित मुलगी गरोदर, प्रसूतीनंतर नवजात बालक सुरक्षित

Dada Bhuse
साताऱ्यातील मिलिटरी गावाचा इतिहास जगासमोर येणार, मंत्री दादा भुसे यांचा निर्णय

MVA partners raise alarm over rising dues & debt of MahaVitaran, demand urgent remedial measures to save Maharashtra from blackouts

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास, सैनिक कल्याण विभाग पुणे चे संचालक प्रमोद यादव, सैनिक कल्याण विभाग पुणे उपसंचालक ले.कर्नल आर. आर. जाधव, सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  विजयकुमार पाटील, निवृत्त ब्रिगेडियर मोहन निकम उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी