31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअवैध दारू व ताडी वाहतुकप्रकरणी दोघेजण ताब्यात

अवैध दारू व ताडी वाहतुकप्रकरणी दोघेजण ताब्यात

टीम लय भारी

कराड : नारायणवाडी कराड व शहर हद्दीत असे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध मद्य वाहतुक करणार्‍या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून ताब्यात घेतले. त्यांच्या सुमारे 2 लाखांचा मुुद्देमाल जप्त करण्यात आला (illegal liquor and palm transport case under 2 people arrested).

मुबारक दादापिर मकानदार (वय 32) रा. शनिवार पेठ, ता. कराड, सोमनाथ बबन गायकवाड (वय 28) रा. खोडशी, ता. कराड अशी अवैध दारू वाहतुकप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडित मुलगी गरोदर, प्रसूतीनंतर नवजात बालक सुरक्षित

आदित्य ठाकरेंची शहर सुशोभिकरणाकडे वाटचाल, सौंदर्याचा घातला घाट

याबाबत मिळालेली माहिती अशी, नारायणवाडी ता. कराड व कराड शहर हद्दीतून अवैध मद्य वाहतुक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या कराड विभागाच्या पथकाला मिळाली. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने नारायणवाडी व कराड शहरात सापळा लावून अवैध दारू वाहतुक करणार्‍या मुबारक मकानदार व सोमनाथ गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी दारूचे 8 बॉक्स व 140 लिटर ताडी आणि दोन चारचाकी गाडी असा 2 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूरचे उपआयुक्त वाय. एम. पवार यांचे आदेशान्वये व सातारा अधीक्षक अनिल चासकर यांचे मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. एस. साळवे, दुय्यम निरीक्षक आर. एस. खंडागळे, जवान विनोद बनसोडे, भिमराव माळी, एस. बी. जाधव यांनी केली. यापुढेही सदर कालावधीमध्ये अशीच कार्यवाही करण्यात येईल असे निरीक्षक एस. एस. साळवे यांनी सांगितले.

संजय राऊत माझे मित्र : चंद्रकांत पाटील

illegal
अवैध दारू व ताडी वाहतुकप्रकरणी दोघेजण ताब्यात

Don’t fall for no man’s lands in Yelahanka Read more at: 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी