23 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeराजकीयभाजपच्या महिला आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजपच्या महिला आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम लय भारी

मुंबई : भाजप महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. महिलांच्या सुरक्षे संदर्भात त्यांनी हे पत्र लिहिले आहे. आम्ही सावित्रींच्या लेकी असे म्हणत त्यांनी हे पत्र मंत्रालयाच्या पत्यावर पाठवले आहे (BJP women MLAs wrote letter to Chief Minister Uddhav Thackeray).

राज्याची कायदा सुव्यवस्था, महिलांची आणि जनतेची सुरक्षा हा विषय संपूर्णपणे राज्य सरकारच्या अख्यात्यारित येतो. असा उल्लेख मुख्यमंत्र्यानी राज्यापालांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या महिन्यापासून सतत महिलांवर तालिबानी अत्याचार सुरु आहेत. याची कल्पना मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या कार्यालयाला असेल किंवा नाही असे म्हणत भाजप महिलांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

कोरोना महामारीनंतर कराडमध्ये सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

चोरटयांनी चोरले चक्क शाळेतील टीव्ही

साकीनाका येथे झालेल्या पाशवी अत्याचारांनंतरही महिलांवर मुंबईपलीकडेदेखील अत्याचार होत आहेत याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचत नसाव्यात. तसेच परभणीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पीडित मुलीने विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले. याची माहिती गृहखात्यामार्फत आपणास समजली आहे असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.

अवैध दारू व ताडी वाहतुकप्रकरणी दोघेजण ताब्यात

Maharashtra: FIR registered against BJP leader Pravin Darekar for allegedly using objectionable words against NCP and women

राज्यातील महिला असुरक्षितेतच्या वातावरणात वावरत असून, दिवसागणिक महिलांची अब्रू लुटली जात आहे. त्यामुळे या गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत. केंद्र सरकारने अधिवेशन आयोजित करावे हे सांगण्याऐवजी महाराष्ट्रातील या लज्जास्पद घटनांचे पाढे संसदेत वाचावे अशी आशा न बाळगता मुख्यमंत्र्यांनी ठोस पाऊले उचलावीत व महिलांना सुरक्षिततेची हमी द्यावी असा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकारकडे बोट दाखवून अशा घटनांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांना टाळता येणार नाही. असा ईशारा महाराष्ट्रातील भयग्रस्त महिलांच्या वतीने आम्ही देत आहोत. तसेच योग्य ती दखल आपण घ्याल व राज्यातील अनगोदींचे लंगडे समर्थन आपण थांबवाल अशी अपेक्षा या पत्रात मांडण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी