31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयस्वातंत्र्यावर बोलू काही !

स्वातंत्र्यावर बोलू काही !

मेघना कविता शिवाजी

एका मोठ्या संघर्षमय पर्वाचा अंत होऊन 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला आणि आज भारतभर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे. पण हा आनंद लुटणारे आपण आणि आपले घर स्वतंत्र आहे का? (I want to say something about freedom).

नोकरी करायची इच्छा असूनही परवानगी नाही म्हणून घरकाम करणारी आई, आवड नसूनही कुणाच्या तरी धाकाखाली इंटरेस्ट नसणाऱ्या क्षेत्रातले शिक्षण घेणारी मुले, सातच्या आत घरात या दडपणाखाली वावरणाऱ्या मुलींना घराच्या आणि पर्यायाने आपल्या स्वातंत्र्यावर प्रश्न निर्माण होतोच. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य या दोन्ही टोकांमधल हे गुदमरण फक्त मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांमध्ये असते अस नाही, तर स्वतःला उच्चप्रभू समजून घेणाऱ्या लोकांच्या घरातही हे पहायला मिळते. सो कॉल्ड स्टेटससाठी स्वातंत्र्य मिरवण आणि स्वतःसाठी ते जगणे यात खूप मोठे अंतर आहे. मुळात स्वातंत्र्य ही मिरवण्याची गोष्टच नाही (Freedom is not a matter of walking).

देश स्वातंत्र्यात, जनता पारतंत्र्यात; मोदी सरकारची किमया

मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना केले अभिवादन

आजही आपल्या घरात आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली जात नसेल, मोठ्या मोठ्या निर्णयांमध्ये स्त्रियांची मत विचारत घेतली जात नसतील, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे वैयक्तिक स्वातंत्र्य जपले जात नसेल तर आपले घर स्वातंत्र्यात आहे का ?

I want to say something about freedom
देश स्वतंत्र आहे आपण देशातील स्त्रीला स्वतंत्र आहे का

खरंतर देशाला स्वातंत्र्य हवे होते ते परकियांकडून पण इथे आपलीच माणसे, आपलीच नाती, आपलेच घर सगळे सगळे आपलेच मग संघर्ष करण्यासाठीच धाडस देखील आपोआप कमी होत. काही लोक करतात धाडस पण ते सुद्धा बंडखोर ठरवले जातात. जगात स्वातंत्र्याची मूल्य रुजली ती दुसऱ्या महायुद्धामुळे. मग घरात स्वातंत्र्याची मूल्य रुजण्यासाठी कुठल्या महायुद्धाची वाट पहायची. पारतंत्र्यात असणाऱ्या देशाची घुसमट दिसली तरी होती पण पारतंत्र्यात असणाऱ्या घराची आणि माणसांची घुसमट दिसतही नाही. ती कायम लपवली जाते इज्जत, मोठेपणा आणि नावाच्या मागे (freedom inculcate the value We had to wait for a world war to).

‘सर सलामत तो हेल्मेट पचास’: छगन भुजबळ

Giant Mural On Freedom Fighters Adorns Wall Of Containers At Red Fort

हे कुठेतरी थांबायला हववे, आपले स्वातंत्र्य आपण जपायला हवे, मिळवायला हवे, जगायला हवे. आज आपण कोणाकडून तरी स्वातंत्र्याची अपेक्षा करतोय, उद्या दुसरे कुणीतरी आपल्याकडून देखील स्वातंत्र्याची अपेक्षा करेलच की ! चौकटी आखून देणाऱ्या माणसांपेक्षा चौकटीबाहेर न पडणारी माणसे जास्त वाईट असतात. कारण आज त्यांचे चौकटीबाहेर न पडणे उद्या कुणाच्या तरी चौकटी बाहेर न पडण्याचे कारण होऊ शकत. पारतंत्र्यात राहण्याची आपली सवय आपल्याच घरातल्या पुढच्या पिढीच्या स्वातंत्र्याची शिक्षा होऊ नये इतकेच आजच्या दिवशी वाटते (freedom should not be punished for next generation)

जय हिंद !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी