31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeसंपादकीयदाभोलकरांच्या हत्येचा म्होरक्या कधी सापडणार?

दाभोलकरांच्या हत्येचा म्होरक्या कधी सापडणार?

प्राची ओले : टीम लय भारी

मुंबई: 20 ऑगस्ट 2013 रोजी, ज्या दिवशी संपूर्ण देश रक्षाबंधन साजरा करीत होता. काही क्रूर प्रतीगामी विचारांच्या मूलतत्त्ववादी लोकांनी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली. ही हत्या होऊन 8 वर्षे पूर्ण झाली तरी, या कटाचा मूळ सूत्रधार हाती लागलेला नाही (Narendra Dabholkar was assassinated who was Chairman of the Committee for the Elimination of Superstition).

समाजात अंधश्रद्धेचा नायनाट कारण्यासाठी वाहून घेतलेल्या नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांची ताकद, जे लोक सहन करू शकले नाहीत त्यांनी हत्या केली. नरेंद्र दाभोलकरांसारखे समाजात हिंदुत्ववादला विरोध करणाऱ्या कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश या तिघांची देखील हत्या करण्यात आली. या तिघांच्या हत्येत साम्य आढळून आले आहे. या गुन्ह्यांचे गुन्हेगार सापडले पण मुळ सूत्रधार अजून देखील लपून बसले आहेत.

गोमूत्र शिपडणारे समोर असते, तर तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखे पाजले असते : नितेश राणे

क्रिकेटपटू सूर्यकुमार आणि पृथ्वीने केली ‘ बाजीगर ‘ चित्रपटाच्या कॉमेडी सीनची पुनरावृत्ती

Narendra Dabholkar
दाभोलकरांच्या हत्येचा म्होरक्या कधी सापडणार?

दाभोलकरांसारखेच काम करणाऱ्या ह्या विद्वान लोकांना कोणतेही राजकारण पाहिजे नव्हते. ह्यांना फक्त समाजात चांगला बदल घडवून आणायचा होता. त्यांचा देवाला , श्रद्धेला विरोध नव्हता. अंधश्रद्धा आणि देवाच्या नावावर चाललेला खेळ थांबवायचा होता. अंधश्रद्धेमुळे आपला देश किती मागे आहे, हे यांना समाजाला सांगायचे होते, समाजाचे भले व्हावे म्हणून.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्त्या करून ह्या लोकांना वाटले असेल की, आपण नरेंद्र दाभोलकरांचे विचार संपवू. तर, ते अशक्य आहे. दाभोलकरांचा हा परिवर्तनाचा विचार चिरंतर रहाणार आहे. माणूस मारून विचार संपत नाही, विचारांमध्ये खूप ताकद आहे. हे विचार ज्या विरोधकांना खुपले त्यांनी हे निर्घृण काम केले.

साताऱ्याचे ‘कास पठार’ पर्यटकांसाठी खुले

Eight years after Dr Narendra Dabholkar’s murder, arguments about framing of charges expected to begin on Friday

या घटनेचे आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत. वीरेंद्र तावडे, अमोल काळे, सचिन अंदुरे अशी त्यांची नावे आहेत. परंतु ह्यांच्या मनात डॉक्टरांविषयी वाईट भरवून देणारा त्यांचा मूळ सूत्रधार 8 वर्षे झाले तरी अजून सापडलेला नाही. हे लोक धर्माच्या नावावर जनतेला भडकावतात. या लोकांना विद्वान व्यक्तींच्या विचारांची भीती वाटते आणि त्यामुळे हे लोक अशा लोकांना समाजातून संपवून टाकतात.

अंनिसने कधीच हिंदू धर्मावर फुली मारा असे सांगितले नाही. अंनिस हे नेहमी संविधानाला मानून चालणारे आहे. घटनेनुसार प्रत्येकाला आपला धर्म मानण्याचा, ठरवण्याचा अधिकार आहे. अंनिसचा विरोध आहे हिंदुत्ववादाला. असा हिंदुत्ववाद जो लोकांच्या प्रगतीच्या आढ येतो. जो मनुस्मृतीला मानतो. जो समाजात हिंसाचार प्रस्थापित करतो. गांधी यांची हत्या ही या मूलतत्त्ववाद्यांनी केलेली पहिली हत्या आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी