30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रडॉ. नितीन राऊत यांनी कोरोना रोखण्यासाठी विदर्भात घेतला पुढाकार

डॉ. नितीन राऊत यांनी कोरोना रोखण्यासाठी विदर्भात घेतला पुढाकार

टीम लय भारी

नागपूर : राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विदर्भातील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. तिसऱ्या लाटेपासून संरक्षण व्हावं म्हणून लसीकरणाचा वेग वाढवला आहे ( Nitin Raut has implemented a number of measures to prevent corona infection in Vidarbha). 

लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. अनेकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे त्याच बरोबर तिसऱ्या लाटेने विदर्भात प्रवेश करूच नये याची काळजी घेतली आहे.

आदित्य ठाकरेंची कल्पकता, पर्यटनवाढीसाठी केला नवा प्रयोग

आता तरी मोदी देवा पावणार का : राष्ट्रवादीने मोदीदेवाची केली अनोखी आरती

डॉ. नितीन राऊत हे नागपूर येथील पालकमंत्री व लोकप्रतिनिधी आहेत परंतु संपूर्ण विदर्भासाठी ते नेहमीच कार्यरत असतात. त्यांनी कोरोनासंदर्भात संपूर्ण विदर्भासाठी ज्या उपाययोजना राबविल्या आहेत त्याबद्दल विदर्भातील लोक कृतज्ञ आहेत.

 Nitin Raut
कोरोना रोखण्यासाठी विदर्भात घेतला पुढाकार

विदर्भाच्या विकासकामांसाठी व तेथील जनतेवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी संपूर्ण विदर्भाची बाजू घेऊन आपली भूमिका मांडली आहे. डॉ. नितीन राऊत यांचा विधिमंडळात प्रवेश झाल्यापासून त्यांचे संपूर्ण विदर्भाकडे झुकते माप दिसून येते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्यावेळीसुद्धा जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र प्राणवायूच्या कमतरतेच्या अडचणीत होता त्यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी हवेतून प्राणवायू तयार करणारी उपाययोजना केली होती. ऊर्जा विभागाच्या महानिर्मिती कंपनीच्या मदतीने हवेतून प्राणवायू निर्माण करता येत असल्याने आता यापुढे धोका असलेल्या तिसऱ्या लाटेत विवोदर्भाला प्राणवायूची कमतरता भासणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आहे.

विदर्भाची लोकसंख्या सुमारे अडीच कोटी इतकी आहे. त्यातील जवळजवळ ९५ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. यापैकी २४.५० लाख लोकांना लसीच्या दुसऱ्या मात्र सुद्धा देण्यात आल्या आहेत. विदर्भातील बराचसा भाग हा ग्रामीण आहे आणि जनता साधन नाही त्यामुळे बरेच जण लसीकरण केंद्रांवर येऊ शकत नाहीत. त्याच बरोबर बरेच जण आजारी व वयोवृद्ध सुद्धा आहेत त्यांना लसीकरणासाठी येत येत नसल्याने त्यांच्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे विदर्भातील ११ जिल्ह्यात लसीकरण करण्यासाठी २०० वाहने तैनात केली आहेत. संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय कोरोनाचा धोका पूर्णपणे टळणार नाही म्हणून दुर्गम भाग असून सुद्धा डॉ. नितीन राऊत यांनी असा निर्णय घेतला आहे.

आदित्य ठाकरेंची कल्पकता, पर्यटनवाढीसाठी केला नवा प्रयोग

Nagpur police doing good job, says district guardian minist

राज्याचे ऊर्जामंत्री या नात्याने त्यांनी ऊर्जा विभागातील महापारेषण अंतर्गत कम्पनीसाठी सामाजिक भान ठेवत २५ कोटी खर्च करून २०० लसीकरणासाठी सुसज्ज वाहने नागपूर आणि अमरावतीला भेट दिले आहेत. शुक्रवारी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना देताना नागपूर येथील मानकापूर स्टेडियमवर आयोजित केलेल्या एका भव्य कार्यक्रमात ही लसीकरण वाहने प्रशासनाला सोपवली जात आहेत. त्यांना जीवन रथ असे नाव देण्यात आले आहे.

यानंतर सर्व वाहने विदर्भातील प्रत्येक तालुक्याला सोपविली जातील. नागपूर व अमरावती विभागीय आयुक्त यांच्या देखरेखीखाली विदर्भातील १२० तालुक्यात ही लसीकरण वाहने गरजूंच्या लसीकरणासाठी तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रात तैनात होणार आहेत. गर्भवती स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक, अंथरूणाला खिळलेले रूग्ण आणि दिव्यांग व्यक्ती यांच्या घरी जाऊन लसीकरणासाठी तसेच आकस्मिक व आपत्कालिन परिस्थितीत आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय चमूस रूग्णापर्यंत पोहोचण्यासाठी ही लसीकरण वाहने उपयुक्त ठरणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी