29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
HomeमुंबईRaj Thackeray : राज ठाकरे गहिवरले...

Raj Thackeray : राज ठाकरे गहिवरले…

महाराष्ट्रात सुद्धा या दुःखाची लकेर उमटली अनेक बड्या नेत्यांनी सुद्धा श्रद्धांजली देत राणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाने गहिवरले असून त्यांनी सोशल मीडियावर एलिझाबेथ द्वितीय यांच्या काही आठवणी शेअर करीत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काल (दि.08 सप्टेंबर) निधन झाले. राजेशाहीच्या एका शानदार पर्वाचा अंत झाल्याचे म्हणत जगभरातून अनेकांनी दुःख व्यक्त केले. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची वार्ता अनेकांना चटका लावून गेली. महाराष्ट्रात सुद्धा या दुःखाची लकेर उमटली अनेक बड्या नेत्यांनी सुद्धा श्रद्धांजली देत राणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाने गहिवरले असून त्यांनी सोशल मीडियावर एलिझाबेथ द्वितीय यांच्या काही आठवणी शेअर करीत श्रद्धांजली अर्पण केली आहे. एलिझाबेथ द्वितीय या गेल्या ऑक्टोबर पासून शारिरीक व्याधींमुळे त्रस्त असल्याने त्या कायम डाॅक्टरांच्यात देखरेखीखाली होत्या, काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून ते सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यामध्ये राज ठाकरे लिहितात, ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय ह्यांचं निधन झालं. ७० वर्ष त्या ब्रिटनच्या महाराणी पदावर होत्या आणि ही 70 वर्ष कुठली तर जगभरातून राजेशाही संपुष्टात आलेली असताना, जगभरात लोकशाहीचे वारे वेगाने वाहत असतानाची 70 वर्षे असे म्हणून अनेक वर्षे राजेशाही सांभाळणाऱ्या एलिझाबेथ द्वितीय यांच्याविषयी लिहिले आहे.

हे सुद्धा वाचा…

Chandrashekhar Bavankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उंटाच्या पार्श्वभागाला मुका घेण्याचा प्रयत्न…

Ganeshotsav 2022 : गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी

Brahmastra : रिलीजआधीच ‘ब्रह्मास्त्र’ची चलती, कमाईचे तोडले रेकाॅर्ड

पुढे राज ठाकरे म्हणतात, युरोपमधली अनेक राजघराणी ही रक्तरंजित क्रांत्यांनी उलथवून टाकली गेली. पण ब्रिटनची राजेशाही टिकली ती ब्रिटिशांचा त्यांच्या परंपरांविषयी असलेला कमालीचा अभिमान आणि बदलाचे वारे समजून घेत हस्तदंती मनोऱ्यातून बाहेर येण्याची तयारी, कधी नाईलाजाने तर कधी आनंदाने दाखवलेल्या राणीमुळे, म्हणजे अर्थात क्वीन एलिझाबेथ 2 यांच्यामुळे असे म्हणून त्यांनी एलिझाबेथ 2 यांचे कौतुक केले आहे.

Raj Thackeray : राज ठाकरे गहिवरले...

ब्रिटनच्या राजघराण्याचे लाड का पुरवायचे मुळात त्यांची गरज आहे का असा विचार एका बाजूला बळावत होता. त्याचवेळेस आजोबांच्या वयाचा विन्स्टन चर्चिलसारख्या कमालीच्या लोकप्रिय आणि करिष्मा असलेल्या पंतप्रधानांना हाताळायचं, तर पुढे कमालीचा स्वतंत्र बुद्धीच्या समन्वस्क मार्गारेट थॅचर ह्यांच्याशी कितीही खटके उडाले तरी स्वतःचा इगो बाजूला ठेवत, संविधानाची चौकट राखणं हे कमालीचं कौशल्य एलिझाबेथ द्वितीय यांनी दाखवलं, असे म्हणून राज ठाकरे यानी राणी एलझाबेथ यांच्या कार्यकतृत्वाची पाठराखण केली आहे.

राज ठाकरे म्हणतात, आणि म्हणून इतक्या भानगडी आणि शब्दशः ब्रिटिश राज्यघराण्याचं खाजगी आयुष्य ब्रिटिश टॅब्लाॅइड्सनी चव्हाट्यावर आणून सुद्धा राणीबद्दल ब्रिटिशांचं प्रेम आणि जगाचं कौतुक टिकलं. कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो. हे एकटेपण 70 वर्ष सोसलेल्या एलिझाबेथ 2 ह्यांच्या शिरावरून हा मुकूट उतरला. एलिझाबेथ 2 ह्यांचं एक युग होतं, ते संपलं. आता नवीन सुरू होतंय का, राजघराण्याचा सूर्य मावळतोय हे बघणं कुतूहलाचं असेल असे म्हणून ठाकरे यांनी एलिझाबेथ नंतर काय असा सवाल करीत हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

पत्रकाच्या सगळ्यात शेवटी राज ठाकरे म्हणतात, एलिझाबेथ 2 ह्यांच्या स्मृतीस अभिवादन असे म्हणून ठाकरे यांनी ब्रिटनच्या महाराणीला लेखणीद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान राज ठाकरे यांनी अखेरीस केलेल्या प्रश्नावर जगभरातून उलटसूलट चर्चा सुरू झाल्या आहेत, त्यामुळे ब्रिटनच्या राजघराण्याचे आता नेमकं काय होणार, कोण सुत्रे हाती घेणार हे पाहणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी