28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeफोटो गॅलरीGaneshotsav 2022 : गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी

Ganeshotsav 2022 : गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी

आज संपुर्ण शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून लालबाग - परळमध्ये सुद्धा विसर्जनाचा मोठा सोहळा सुरू झाला आहे. तब्बल दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर यंदाचा गणेशोत्सवाचा सण जोशात, जल्लोषात साजरा करण्यात आला, तसाच उत्साह आज विसर्जनाच्या दिवशी सुद्धा ओसांडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे.

आज आपला लाडका गणपती बाप्पा सगळ्यांचा निरोप घेईल. मुंबईतील सगळ्याच मोठ्या गणपतींचे आज विसर्जन होणार आहे, त्यामुळे आज मुंबईकरांची कमालीची लगबग – लगबग सुरू झाली आहे. दहा दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे तयार झाले आहेत. मुंबईतील सगळ्याच मोठ्या गणेश मंडळांचे आज विसर्जन होणार असल्याने मुंबईतील रस्ते गर्दीने अगदी फुलून गेले आहेत. गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेडून सुद्धा जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी महापालिकेकडून गणेश भक्तांसाठी ऑनलाईन विसर्जनाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे यंदाचा विसर्जन सोहळा नेहमीप्रमाणे दैदिप्यमान असाच ठरणार आहे.

आज संपुर्ण शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून लालबाग – परळमध्ये सुद्धा विसर्जनाचा मोठा सोहळा सुरू झाला आहे. तब्बल दोन वर्षांच्या कोरोना निर्बंधांनंतर यंदाचा गणेशोत्सवाचा सण जोशात, जल्लोषात साजरा करण्यात आला, तसाच उत्साह आज विसर्जनाच्या दिवशी सुद्धा ओसांडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे. विसर्जनाच्या रंगात न्हाऊन गेलेले सगळे गणेशभक्त गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या चे नारे लगावत असताना दिसत आहेत. याच उत्सवात काळजी घेत मुंबई महानगर पालिकेने मुंबईकरांना काही महत्त्वपूर्ण आवाहन केले असून विसर्जनाबाबत संपुर्ण काळजी महापालिकेकडून घेण्यात आलेली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत, तसेच 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्षांची निर्मिती करण्यात आलेली आहे. जिथे जिथे नैसर्गिक विसर्जन स्थळ आहेत त्या ठिकाणी आवश्यक तिथे 45 मोटार बोट आणि 39  जर्मन तराफ्याची व्यवस्था करण्याच आलेली आहे. विसर्जनाच्या वेळी सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जन स्थळी महापालिकेकडून 211 स्वागत कक्ष तयार करण्यात आलेले आहेत. विसर्जन सोहळा उशीरा पर्यंत चालू राहतो त्यासाठी अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्था व्हावी म्हणून 3 हजार 069 फ्लड लाईट आणि 71 सर्च लाईट व्यवस्था करण्यात आलेली आहे.

Ganeshotsav 2022 : गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी

हे सुद्धा वाचा…

Brahmastra : रिलीजआधीच ‘ब्रह्मास्त्र’ची चलती, कमाईचे तोडले रेकाॅर्ड

Lumpy Skin : जनावरांना ‘लम्पी’ आजाराचा धोका

अमित शहांचे सुक्षाकवच तोडणाऱ्या ‘त्या’ तरुणाची ओळख पटली

शिवाय महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे 188 प्रथमोपचार केंद्र आणि 83 रुग्णवाहिका सज्ज करून ठेवण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या वेळी निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे 357 निर्माल्य कलश आणि 287 निर्माल्य वाहने तयार ठेवण्यात आलेली आहेत. सुरक्षिततेची सुद्धा यावेळी चांगली काळजी घेण्यात आलेली असून अधिक चांगल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी 48 निरीक्षण मनोरे आणि आवश्यक तेथे संरक्षक कठडे उभारण्यात आलेले आहेत. महत्त्वाच्या विसर्जन स्थळांवर 134 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

यावेळी महापालिकेकडून ऑनलाईन विसर्जन नोंदणी सुरू करण्यात आलेली असून https://shreeganeshvirsarjan.com या संकेत स्थळावर ही नोंदणी सुरू आहे. दरम्यान, चौपाट्यांवर विसर्जन करत असताना येणाऱ्या वाहनांची चाके वाळूत रुतून बसू नये म्हणून 460 पौलादी प्लेटची व्यवस्था करण्यात आली आहे, शिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये कृत्रिम विसर्जन स्थळांची सुद्धा व्यवस्था केली आहे. या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे संबंधित सुमारे 10 हजार अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी