34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशनJEE, NEET परीक्षा पुढे ढकला , सोनू सूदची केंद्राकडे मागणी

JEE, NEET परीक्षा पुढे ढकला , सोनू सूदची केंद्राकडे मागणी

टीम लय भारी

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई (JEE) आणि नीट (NEET) परीक्षा पुढे ढकलण्याची  मागणी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने केली. सोनू सूदने ट्विट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे. (actor-sonu-sood-demand-to-postpone-jee-neet-exam )

करोना संकटात आपण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये असं त्याने म्हटलं आहे असं सोनू सूदने ट्विटमध्ये म्हटलं आहे. “देशातील सध्याची परिस्थिती पाहता जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलली जावी अशी माझी भारत सरकारला विनंती आहे. सध्याच्या करोना स्थितीत आपण विद्यार्थ्यांबद्दल जास्त काळजी घेणं गरजेचं असून त्यांना संकटात टाकू नये”.


परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना  केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीतही न्यायालयाने परीक्षा घेतली पाहिजे असा निर्वाळा दिला आहे. विशेष म्हणजे एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे. जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी