33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeएज्युकेशनमुलींना करियरची, तर मुलांना निवडणुकीच्या निकालाची काळजी

मुलींना करियरची, तर मुलांना निवडणुकीच्या निकालाची काळजी

लय भारी न्यूज नेटवर्क

सातारा : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही असे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला होता. शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची संधी दिली. सावित्रीमाईंच्या जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात मुली आघाडीवर  असून त्यांना करियरची काळजी असल्याचे चित्र आहे.

मुलींना करियरची, तर मुलांना निवडणुकीच्या निकालाची काळजी

सातारा जिल्ह्यातील सातारा लोकसभा पोट निवडणूक व आठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रंगत वाढली आहे. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या नवं मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय पक्ष व काही प्रमुख उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून सातारा परिसरातील महाविद्यालय, खासगी शिक्षण संस्था व शिकवणी वर्गाला भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याला उदंड प्रतिसाद लाभत आहे.

राजकीय पक्षांच्या नेत्यांना व प्रमुख उमेदवारांना भेटून सेल्फी काढण्यासाठी युवक वर्ग उत्सुक आहे. ग्रामीण भागातील युवकांना त्याचे खूपच अप्रूप वाटत आहे. पण राजकारणापेक्षा शिक्षण महत्वाचे आहे. स्पर्धेच्या युगात यश मिळविण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी हे पाच ते  वर्षांसाठी असतात. पण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले युवक भविष्यात सेवानिवृत्त होई पर्यंत वरिष्ठ अधिकारी म्हणून रहातात. त्यामुळे राजकारणापेक्षा अभ्यास करून अधिकारी बनण्याचा कल अनेक विद्यार्थीनी मध्ये दिसून येत आहे.

सातारा शहरात महाविद्यालय परिसरात फेरफटका मारला असता विद्यार्थीनी अभ्यासात तर विद्यार्थी हे राजकीय गप्पा मारण्यात धन्यता मानत असल्याचे दिसून आले.  महाविद्यालयाच्या आवारात परीक्षा कालावधीत सर्वच राजकीय पक्षांना प्रचारात बंदी घातली पाहिजे. अन्यथा विद्यार्थी वर्ग उमेदवार पसंत नाही. म्हणजे नोटाला मतदान करा हे सांगण्यासाठी जनजागृती करतील असा इशारा अभय नलावडे, यश पाटील, कुमारी प्रियांका कदम, कुमारी अवणी माने, यास्मिन शेख व इतर विद्यार्थ्यांनी दिला आहे. आमचा प्रचाराला विरोध नाही. पण त्यांनी महाविद्यालयाच्या आवाराच्या बाहेर प्रचार करताना विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न किती सोडविले ? याचीही उत्तरे आणावी अशी मार्मिक टिपणी विद्यार्थीनी करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी