31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeव्हिडीओVideo : मुख्यमंत्र्यांना कौतुक विरोधी पक्षातील उमेदवाराचे

Video : मुख्यमंत्र्यांना कौतुक विरोधी पक्षातील उमेदवाराचे

लय भारी न्यूज नेटवर्क

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका व्यक्तीचे तोंडभरून कौतुक करत आहेत. या व्यक्तीने आखलेल्या आराखड्यासाठी 500 कोटी रुपयांच्या मंजुरीविषयी बोलत आहेत. ज्या व्यक्तीच्या कामाविषयी मुख्यमंत्री तोंड भरून कौतुक करीत आहेत, ती व्यक्ती आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. एवढेच नव्हे, तर मुख्यमंत्री नेतृत्व करीत असलेल्या भाजप उमेदवाराच्या विरोधातच ही व्यक्ती रिंगणात उतरली आहे. ही व्यक्ती भाजप उमेदवारापेक्षाही चांगली आहे, असे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा कौतुक करणारा व्हिडीओ आता त्या मतदारसंघात चांगलाच व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलेल्या या व्यक्तीचे नाव आहे, प्रभाकर देशमुख. प्रभाकर देशमुख हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात देशमुख यांनी जलसंधारण सचिव व कोकण आयुक्त या दोन महत्वाच्या पदांवर काम केले. सचिव असताना देशमुख यांनी जलयुक्त शिवार अभियान ही योजना आणली. देशमुख यांची ही योजना फडणवीस यांनी चांगलीच मनावर घेतली होती. देशमुखांच्या या योजनेचा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा झाला होता. देशमुख कोकण आयुक्त असताना त्यांनी शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा विकास करण्याचे मनावर घेतले. या किल्ल्याचा विकास व्हावा म्हणून देशमुख यांनी 500 कोटीचा आराखडा तयार केला होता. त्याला त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ मंजुरी दिली. एवढेच नव्हे तर, रायगड किल्ला विकास प्राधिकरण स्थापन केले. त्यात देशमुखांनाही संधी दिली. देशमुखांच्या या कामाचे मुख्यमंत्री जाहीर कौतुक करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आता विधानसभा निवडणुकीत देशमुख हे सातारा जिल्ह्यातील माण – खटाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेले जयकुमार गोरे यांना ते टक्कर देत आहेत. मुख्यमंत्री देशमुख यांचे जाहीर कौतुक करीत असलेला हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्याचा फटका गोरे यांना बसू शकतो, असे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी