एज्युकेशन

UPSC परीक्षेत कश्मिरा संखे महाराष्ट्रातून पहिली

देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC च्या सन 2022 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत देशात पहील्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली असून इशिता किशोरी ही देशात पहिली आल आहे. तर ठाण्याच्या कश्मिरा संखे हीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तीने देशात 25 वी रँक पटकावली आहे. कश्मिरा संखे हीने तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. या आधी दोन वेळा तीने UPSC परीक्षा दिली होती.

केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) कडून घेण्यात आलेल्या सन 2022 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत यंदा पहिल्या चार क्रमांकावर मुलींनी बाजी मारली आहे. या परीक्षेचा निकाल युपीएससीच्या www.upsc.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी अत्यंत कष्टाने विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका त्यांना पंधरा दिवसांमध्ये मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

आयटी इंजिनियर तरुणी आई-भावासह बेंगळुरू दर्शन सहलीला निघाली अन् जीवच गमावून बसली !

UPSC परीक्षेत इशिता किशोर देशात पहिली; पहिल्या चार क्रमांकावर मुलींची बाजी

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

युपीएससीच्या अंतिम निकालामध्ये 933 विद्यार्थी यंदा पात्र ठरले आहेत. यामध्ये 345 विद्यार्थी खुल्या गटातून, आर्थिक मागास प्रवर्ग म्हणजेच ईडब्ड्यूएसमधून 99, ओबीसी प्रवर्गातून 263, एससी प्रवर्गातून 154, अजा प्रवर्गातून 72 विद्यार्थ्यी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमधून IAS साठी 180 विद्यार्थ्यांची निवड युपीएससीने केली असून त्याची यादी देखील तयार केली आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

2 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

3 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

3 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

4 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

4 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

6 hours ago