29.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमुंबईमाजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरेंनी घेतली भेट

राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची तब्बेत खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल केले आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतल्याचे वृत्त देखील समोर येत आहे.

मनोहर जोशी हे शिवसेनेच्या स्थापनेच्या काळापासून शिवसेनेत होते. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांपैकी ते एक आहेत. युती सरकारच्या काळात शिवसेकडे मुख्यमंत्रीपद आल्यानंतर मुख्यमंत्रीपदी मनोहर जोशी यांची निवड करण्यात आली होती. काल रात्री अचानक त्यांची तब्बेत खालावल्यानंतर त्यांना माहिम येथील हिंदुजा रुग्णालयातील आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान जोशी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.

हे सुद्धा वाचा

Google तुमचे Gmail अकाऊंट, फोटोज डिलीट करेल; जर तुम्ही ‘हे’ केलेले नसेल तर …

‘एसटी’च्या 100 ई-बस जूनअखेर मुंबई-पुणे मार्गावर धावणार

मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल इतिहासजमा होणार; मग रेल्वेप्रवासाची पर्यायी सोय काय?  

मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी सकाळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. शिवसेनेत फुट पडल्यानंतर ते ठाकरे यांच्या सोबत राहिले. सध्या ते राजकारणात सक्रीय नसले तरी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे ते सदस्य आहेत. मध्यंतरी एकनाथ शिंदे यांनी जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. शिवसैनिक ते नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री खासदार, केंद्रीय मंत्री, लोकसभा अध्यक्ष असा मनोहर जोशी यांची राजकीय प्रवास असून ते शिवसेनेतील जुने जाणते नेते आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी