एज्युकेशन

मन की बात @100: गैरहजर विद्यार्थ्यांना 100 रूपयांचा दंड?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचे नुकतेच 100 भाग पुर्ण झाले. दरम्यान हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी प्रदेश व मुंबई भाजपतर्फे जंगी तयारी करण्यात आली होती. मात्र भारताच्या उत्तराखंड भागातून एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. डेहरादूनच्या जीआरडी निरंजनपुर अकॅडमीत पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला काही विद्यार्थी गैरहजर राहिले. या कारणावरून सदर विद्यार्थ्यांकडून आता प्रत्येकी 100 रुपये दंड आकारण्यात आल्याने पुन्हा एकदा मोदी सरकारचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ रेडीओ कार्यक्रमाचे नुकतेच शतक पूर्ण झाले. अनेक राज्यात मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांनी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. शाळा, महाविद्यालयांतही हा उपक्रम उत्साहात पार पडला. मात्र डेहरादून येथील अकॅडमीतील विद्यार्थ्यांकडून प्रशासनाने 100 रुपये दंड आकारल्याचा आरोप करत पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नॅशनल एसोसिएशन फॉर पॅरेंट्स अँड स्टुडेंट्स राइट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आरिफ खान यांनी यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. मुख्य शिक्षण अधिकारी डेहरादून यांना पत्र लिहून संबंधित शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर, शिक्षण विभागाने या शाळेला नोटिस जारी करत तीन दिवसांत उत्तर मागितले आहे. जीआरडी अकॅडमी शाळा प्रशासनाने ‘मन की बात’ उपक्रमाला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना 100 रुपये दंड आकारला आहे. तसेच, जे विद्यार्थी वैद्यकीय कारणास्तव गैरहजर होते, त्यांना मेडीकल प्रमाणपत्र देणे बंधनकारक केलं आहे.

विशेष म्हणजे शाळेकडून शाळेच्या व्हॉट्असपग्रुवर मेसेज टाकून हा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश जारी करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या आदेशाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. त्यामुळे, आता या शाळा प्रशासनाच्या आदेशावर संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, याप्रकरणी लेखी तक्रार प्राप्त होताच, मुख्य शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार यांनी शाळा प्रशासनाला नोटीस जारी करत ३ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचेही संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर, तक्रारकर्त्या संघटनेकडेही पुरावे मागितले आहेत.

हे सुद्धा वाचा :

LIVE: मन की बात @100

गेली नऊ वर्षे फक्त मन की बात, काम की बात काहीच नाही; संजय राऊतांची मोदींवर सडकून टीका

‘महागाई मॅन’ मोदीचा कहर

Mann Ki Baat, 100 Rupees fine for absent students in Dehradun, Mann Ki Baat@100, Prime minister Narendra Modi Mann Ki Baat 100th radio show, PM Narendra Modi

Team Lay Bhari

Recent Posts

जन आरोग्य योजना भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात

जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…

1 hour ago

नाशिक उंटवाडी रोड येथे दूध नमुना मोफत तपासणी शिबीर

केवळ "विश्वास" या साडेतीन शब्दावर गेली अनेक वर्षे ,रोज सकाळी घरासाठी दूध ( Milk) वापरणारे लाखो…

2 hours ago

मतदान केंद्रावर वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर

उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य…

3 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष सरवण्याचे काम: नाना पटोले

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ( Narendra Modi) आरोप…

3 hours ago

शिवाजीनगर येथील ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी थेट तलावात; शेकडो माशांचा मृत्यू

शिवाजीनगर येथील तलावातील शेकडो माशांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ड्रेनेजचे केमिकलयुक्त पाणी (Chemical-rich…

12 hours ago

नाशकात कारच्या धडकेत घोडीचा दुर्दैवी मृत्यू,तर दोन जखमी

शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दूधबाजारातील अख्तर रझा यांची घोडी एका लग्नसोहळ्यात सहभागी झाली…

12 hours ago