37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
HomeमुंबईLIVE: मन की बात @100

LIVE: मन की बात @100

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाचा आज 100 वा भाग आहे. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी प्रदेश व मुंबई भाजपतर्फे जंगी तयारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यात सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी केले. आज सकाळी 11 वाजता 100 वा भाग प्रसारित होणार आहे. विशेषत: मुंबईत पाच हजार ठिकाणी कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुंबई अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी दिली.  भाजपचे पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना यानिमित्त राज्यभर विविध  ठिकाणी ‘मन की बात’चे  प्रक्षेपण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आशिष शेलार यांनी सांगितले की, मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांतील  5 हजारांहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यटनमंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई महिला कारागृहात कार्यक्रम होणार आहेत. मागाठाणेत घरकाम करणाऱ्या महिला, महिला बचत गट तसेच गृहउद्योगातील महिला, सफाई कामगार, अंगणवाडी सेविका, मुस्लीम महिला, रिक्षाचालक यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवासस्थान 7 लोककल्याण मार्गावर रेकॉर्ड करण्यात आला आहे. यापेक्षा कितीतरी पटीने मोठी तयारी आजच्या शंभराव्या पर्वाची झाली आहे. आज, पंतप्रधान मोदींचा 100 वा मन की बात कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर प्रसारित केला जाईल. मन की बातचा पहिला भाग 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाला होता. तेव्हापासून हा रेडिओ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता प्रसारित केला जातो. त्यामुळे आज 100 व्या विशेष भागासाठी भाजपने जरी जोरदार तयारी केली असली तरी,  मोदी नेमकं काय मन की बात करणार यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

पाहा थेट प्रक्षेपण: 

हे सुद्धा वाचा :

‘महागाई मॅन’ मोदीचा कहर

प्रियांका गांधी पंतप्रधान मोदींवर उखडल्या; ज्याला लेकींची काळजी नाही तो देशाची काय काळजी करणार?

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचाच जलवा; चारही बाजार समित्यांमध्ये वर्चस्व

Modi’s century in Mann Ki Baat@100, Prime minister Narendra Modi Mann Ki Baat 100th radio show

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी