30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeएज्युकेशनMarathi Schools To Be Closed : उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूरात 447 मराठी शाळा होणार...

Marathi Schools To Be Closed : उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूरात 447 मराठी शाळा होणार बंद! राज्यसरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांवर संकट

सध्या महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूर जिल्ह्यात एकुण जिल्हा परिषदेच्या 1516 शाळा आहेतय यांपेकी तब्बल 447 शाळांची पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा कमी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्रात सध्या शिंदे-फडणवीस सरकारने निर्णयांचा तडाखा लावला आहे. यामध्येच शिक्षम क्षेत्रातही अमुलाग्र बदल घडवण्यासाठी एक निर्णय महाराष्ट्र सरकारने लागू केला आहे. त्यामुळे एकटच्या नागपूर जिल्ह्यातील 447 मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्य सरकारने वीस कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचे अथवा जवळपासच्या शाळांमध्ये समायोजित करण्याचे आदेश दिले आहेत. याआदेशांवर सध्या अंमलबजावणी करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सरकारने दिलेल्या आदेशांचे पालन झाल्यास नागपूर जिल्ह्यातील 447 मराठी शाळांवर एकत्रित संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूर जिल्ह्यात एकुण जिल्हा परिषदेच्या 1516 शाळा आहेतय यांपेकी तब्बल 447 शाळांची पटसंख्या 20 किंवा त्यापेक्षा कमी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

शासनाच्या जिल्हापरिषद शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी अनेक उपाैययोजना राबवल्या जात आहेत. यासोबत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यास प्राधान्य द्यावे यासाठी मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके ते भोजम पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तरीही शाळेतील पटसंख्या वाढण्याच्या ऐवजी दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. त्यामुळे या परिस्थितीवर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

हे सुद्धा वाचा

MS DHONI : पाकिस्तानच्या शोएब मलिकची तुलना थेट एमएस धोनीसोबत! माजी खेळाडूच्या वक्तव्याने हाहाकार

Supreme Court : ठाकरे गटाच्या वकीलांकडून शिंदेगटाची कोंडी!

Tollywood Actor In Marathi Film : मृण्मयीच्या आगामी चित्रपटात झळकणार दाक्षिणात्य अभिनेता

नागपूर जिल्ह्यातील तालुक्यांनुसार वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या असलेल्या शाळा

तालुका  शाळांची संख्या
काटोल       51
उमरेड       47
कुही         46
नरखेड      39
सावनेर      39
रामटेक     35
हिंगणा      34
नागपूर      33
भिवापूर     33
पारशिवनी  27
मौदा        25
कळमेश्वर   25
कामठी     13

दरम्यान, या सर्व पिरकरणात आता राज्यसरकार कोणते पाऊल उचलते हे पाहणे महत्तवाचे ठरणार आहे. मात्र, 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांना कुलूप लावल्यास मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फरफट कराीवी लागणार आहे हे स्पष्ट होत आहे. शिवाय सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अवघ्या 3 वर्षांपूर्वी मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची कर्मभूमी असणाऱ्या नागपूर जिल्ह्यात ही परिस्थिती असेल तर एतर जिल्ह्यांतील परिस्थिती आणखी भयावय सेल अशी भिती सध्या व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने शाळा बंद करण्याऐवजी दुसरे एखादे पाऊल उचलावे अशी विणवणी केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी