34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमनोरंजनAdipurush : आदिपुरुष सिनेमाचा वाद दिल्ली कोर्टात! चित्रपटाला बॅन करण्याची होतेय मागणी

Adipurush : आदिपुरुष सिनेमाचा वाद दिल्ली कोर्टात! चित्रपटाला बॅन करण्याची होतेय मागणी

आदिपुरुषा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून राम, रावण अन् हनुमानासह सर्व पात्रांवरही जोरदार टीका होत आहे. या सर्व वादात आदिपुरुषाचे हे प्रकरण दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात पोहोचले आहे.

दसऱ्याच्या दिवशी आदिपरुरुष सिनेमाचा टिझर रिलीज करण्यात आला. त्यानंतर सेशल मिडियावर अनेकांनी या सिनेमाला ट्रोल करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे हा एक ऐतिहासिक सिनेमा असला तरी त्यात अनेक अनैतिहासिक गोष्टी दाखवण्यात आल्या असल्याची टिका सध्या केली जात आहे. बॉलिवूड अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान यांचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ चा टीझर रिलीज झाल्यापासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटातील सैफ अली खानच्या लूकवरून सुरू असलेला वाद शांत होण्याचे नाव घेत नाहीये. आदिपुरुषाच्या हनुमानासह सर्व पात्रांवरही जोरदार टीका होत आहे. या सर्व वादात आदिपुरुषाचे हे प्रकरण दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात पोहोचले आहे.

वास्तविक, आदिपुरुष चित्रपटाबाबत दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत याचिकाकर्त्याने यूट्यूबसह इंटरनेट मीडियाला चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत आणि टीझरमधून आक्षेपार्ह भाग काढून टाकण्याबाबत निर्देश मागितले आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटात भगवान राम आणि हनुमानाची पात्रे चुकीच्या पद्धतीने दाखवून हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत, असा युक्तिवाद याचिकाकर्ते राज गौरव यांनी केला आहे.

यासोबतच या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचे निर्देश देण्याची मागणीही केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर सोमवारी सकाळी 10 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत पुढे म्हटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रामायणासारख्या महाकाव्याच्या मूळ स्वरूपाची छेडछाड करता येणार नाही. रामायण हा भारताच्या संस्कृतीचा, सभ्यतेचा आणि आध्यात्मिक आणि धर्माचा भाग आहे. ते म्हणाले की, वास्तवात भगवान रामाची पारंपारिक प्रतिमा शांत प्रियकर आहे, तर आदिपुरुष चित्रपटाच्या टीझरमध्ये ते अत्याचारी, प्रतिशोधी आणि संतप्त व्यक्ती म्हणून दाखवले आहेत. प्रभास आणि सैफ अली खानचा चित्रपट ‘आदिपुरुष’ 12 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याआधीही चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वादाचे काळे ढग दाटून आले आहेत. अनेक हिंदू संतांनीही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणात चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की, हा केवळ सिनेमाचा ट्रेलर आहे. 12 जानेवारी रोजी जेव्हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होईल त्यावेळी कोणीही निराश होणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. मात्र, तरीही याप्रकरणात सिनेमावरील टिका सुरूच आहे. विशेष म्हणजे भाजप महाराष्ट्राचे नेते राम कदम यांनी सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा ईशारा दिला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सिनेमाला पाठिंबा दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी