34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाDavid Miller : आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेविड मिलरवर दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तिचे...

David Miller : आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेविड मिलरवर दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तिचे कर्करोगाने निधन

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेव्हिड मिलर याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा सर्वात जवळचा चाहता अ‍ॅनी याचे कर्करोगाने निधन झाले आहे. मिलरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अ‍ॅनीबद्दलची एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज डेव्हिड मिलर याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा सर्वात जवळचा चाहता अ‍ॅनी याचे कर्करोगाने निधन झाले आहे. मिलरने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अ‍ॅनीबद्दलची एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच त्यानी आपल्या छोट्या चाहत्यालाही श्रद्धांजली वाहिली आहे.मिलर सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. ती टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी रांचीमध्ये दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. याआधी मिलरला मोठा धक्का बसला होता. त्याची जवळची फॅन अ‍ॅनीचे निधन झाले. मिलरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो अ‍ॅनीसोबत दिसत आहे. त्याने एक इंस्टाग्राम स्टोरीही शेअर केली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dave Miller (@davidmillersa12)

मिलरने एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “मला माझ्या फॅन्सची खूप आठवण येईल. त्याच्याकडे सर्वात मोठे हृदय होते. तुम्ही वेगळ्या पातळीवरचे युद्ध सकारात्मक पद्धतीने लढले आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान पूर्ण केले आहे. तू मला जगायला शिकवलंस.” अशा प्रकारची भावनिक पोस्ट शेअर करत मिलरने अ‍ॅनीला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

हे सुद्धा वाचा

Sharad Pawar : ‘खुदा आपको जन्नत बक्क्षे’, विवेक अग्निहोत्रीने पुन्हा साधला शरद पवारांवर निशाणा

ShivSena : ‘… तर मग मंत्री कशाच्या आधारावर पदावर राहू शकतात?’ – शिवसेना नेत्याचा गद्दारांना सवाल

Apex Council Election : शरद पवारांची फौज उतरली क्रिकेटच्या मैदानात!

विशेष म्हणजे मिलर भारत दौऱ्यावर आहेत. येथे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 9 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता या मालिकेतील दुसरा सामना रांचीमध्ये होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला पुनरागमन करणे आत्यावश्यक आहे. भारतीय संघाने हा सामना गमावल्यास मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-0ने विजय आघाडी घेण्यास यशस्वी ठरेल. आणि भारताच्या नावे वनडेमालिकेतील लाजीरवाणा पराभव लिहिला जाईल.

यापूर्वी तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली होती. यामध्ये भारताने 2-1 असा विजय मिळवला. यावेळी डेविड मिलरने दुसऱ्या टी20 सामन्यात शतक झळकावले. आफ्रिकेला दुसऱ्या टी20 सामन्यात पराभव स्विकारावा लागला असला तरी डेविड मिलरच्या खेळीने सर्व भारतीय चाहत्यांची मने जिंकली होता. आता मात्र, स्वत: डेविड मिलर दु:खात असल्याने दु:खातून सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी