मनोरंजन

KBC 14 : केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चनने सांगितला पाणीपुरीचा किस्सा

‘कौन बनेगा करोडपती 14’चा हा सीझन सध्या खूप चर्चेत आहे. शोमध्ये स्पर्धक आपले नशीब आजमावण्यासाठी सहभागी होत आहेत. तसेच शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्या जीवन कथा त्यांच्या चाहत्यांना विचार करायला लावतात. अमिताभ बच्चन हे नेहमीच आपले वेगवेगळे अनुभव शेअर करत असतात. ज्यामुळे कोणीही आश्चर्यचकित होता. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्येही असंच काहीसं घडलं. अमिताभ बच्चन यांनी स्पर्धक गार्गी सेनसोबत कामाच्या दिवसातील त्यांचा वैयक्तिक अनुभव शेअर केला. यावेळी अमिताभ यांनी सांगितले की, कोलकाता येथे काम करताना कमी पैसे मिळाल्याने ते फक्त पाणीपुरी खाऊन जगले आहेत.

अमिताभ बच्चन यांचा पगार आणि गोलगप्पा
कौन बनेगा करोडपतीच्या नवीन भागात अमिताभ बच्चन यांनी स्पर्धक गार्गीचे शोमध्ये स्वागत केले. जी कोलकाता, पश्चिम बंगालची होती. गार्गी व्यवसायाने आर्थिक सल्लागार होत्या. या भागामध्ये अमिताभ काळ्या टी-शर्टसह स्टायलिश ग्रे रंगाच्या कोटमध्ये दिसत आहेत. स्पर्धक गार्गीला ‘राज का ताज’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संग्रहालयाशी संबंधित प्रश्न येतो. तेव्हा सेटवर मोठ्या पडद्यावर दाखवलेल्या म्युझियमच्या नावाचे अचूक उत्तर देते आणि योग्य उत्तर देत रक्कम जिंकली.

अमिताभ बच्चन पाणीपुरी खाऊन काढत दिवस
गार्गीने बरोबर उत्तर दिल्यानंतर, अमिताभ बच्चनने व्हिक्टोरिया मेमोरिअलच्या कथेसह त्यांचे पाणीपुरीबाबतचे प्रेम सर्वांना सांगितले. तसेच याबाबतची आठवण सुद्धा सर्व प्रेक्षकांसह शेअर केली. यावेळी अमिताभ बच्चन म्हणाले की, या व्हिक्टोरिया मेमोरिअलच्या समोर एक पाठक आहे, तिथे जगातील सर्वोत्तम पुचका (पाणीपुरी) मिळतो. आमच्यासारखे लोक ज्यांचा पगार 300-400 असायचा, आम्ही तिथे काम करणारे तेव्हा खाण्यापिण्याची खूप अडचण असल्याने पाणीपुरी खाऊन आपले दिवस काढत होतो. दोन आणे-चार आणे स्वस्त असल्याने पाणीपुरी खाऊन आमचा उदरनिर्वाह चालायचा. खूप चांगली पाणीपुरी मिळत असल्याने तेच पोटभर खाऊन उदरनिर्वाह करायचो.

हे सुद्धा वाचा

Bollywood : अटल बिहारींची भूमिका साकारणार पंकज त्रिपाठी; रवी जाधव करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

Raju Shetti : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचे ऊस तोड बंद आंदोलन

PHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन… असा आहे जुही चावलाचा प्रवास

अमिताभ बच्चनचा चित्रपट
नुकताच अमिताभ यांचा ‘उंचाई’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अनुपम खेर, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंगपा, परिणीती चोप्रा, सारिका आणि नीना गुप्ता आहेत. कथा तीन जुन्या मित्रांची आहे, जे आपल्या दिवंगत मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी एव्हरेस्टवर चढण्यासाठी निघाले आहेत. या चित्रपटामुळे सूरज बडजात्याने शेवटचा चित्रपट ‘प्रेम रतन धन पायो’ नंतर सात वर्षांनी दिग्दर्शक म्हणून पुनरागमन केले आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

अजित पवार चंबळच्या खोऱ्यातून आलेत, बारामतीचा करणार बिहार !

अजित दादा, काय करून ठेवलंय तुम्ही हे. अहो, बारामतीचा अख्ख्या देशात नावलौकीक होता. विकास म्हणजे…

2 hours ago

नारळपाणी पिण्याचे फायदे

नारळपाणी म्हणजे उन्हाळ्यातील एक प्रकारचं अमृतचं पण नारळपाणी आपण फक्त उन्हळ्यातच नाहीतर बाकीच्या ऋतूंमध्ये देखील…

3 hours ago

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

19 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

19 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

20 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

20 hours ago