25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमहाराष्ट्रRaju Shetti : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचे ऊस तोड बंद आंदोलन

Raju Shetti : एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानीचे ऊस तोड बंद आंदोलन

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यात आंदोलन करत ऊस तोड बंद आंदोलन केले. उसाला एक रकमी एफआरपी, वजनामध्ये होणारी लूट थांबवावी, साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयांचा अधिकचा भाव द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे. जिह्यात आज अनेक ठिकाणी ऊसतोडी बंद पाडण्यात आल्या.

राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली जिल्ह्यात आंदोलन करत ऊस तोड बंद आंदोलन केले. उसाला एक रकमी एफआरपी, वजनामध्ये होणारी लूट थांबवावी, साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयांचा अधिकचा भाव द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक झाली आहे. जिह्यात आज अनेक ठिकाणी ऊसतोडी बंद पाडण्यात आल्या. यावेळी स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांमधील हवा सोडून जवळपास अडीचशे ट्रॅक्टर रोखले, तसेच ऊस वाहतूक करणारी वाहने रस्त्यांवर दिसल्यास पेटवून दिली जातील असा इशारा देखील स्वाभीमानी संघटनेने दिला आहे.

काल पासून सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे, शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत ऊस वाहतूक करणारी वाहने रोखली. पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्यावर निदर्शने करत ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमधील हवा सोडली. हुतात्मा आणि राजारामबापू करखण्याला जाणाऱ्या वाहनांची हवा सोडण्यात आली. खानापूर तालुक्यातील उदगिरी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरमधील हवा देखील कार्यकर्त्यांनी सोडली. तसेच कडेगाव-पाचवा मैल रस्त्यावर, बावची फाट्यावर आंदोलन झाले. मिरज तालुक्यात देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखान्याकडे वाहतूक होणाऱ्या चार बैलगाड्या रोखल्या.

जिल्ह्यातील कारखाना कार्यक्षेत्रातील अनेक गावांमध्ये स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. तसेच ज्या ठिकाणी ऊस तोडणी सुरू होती तेथे ऊस तोडण्या देखील बंद केल्या.स्वाभिमानी शेतकरी संघटना एकरकमी एफआरपी, वजनकाटे अशा अनेक मागण्यासाठी आकमक झाली असून हे आंदोलन आणखी तीव्र स्वरूपात होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा :
मुंबईतील कामे वेळेत पूर्ण करा; पालिका अधिकाऱ्यांना पालकंत्री केसरकरांच्या सूचना

KEM Hospital: केईएम हॉस्पिटल मधील नर्सेस आक्रमक; रुग्णालय प्रशासनविरोधात आंदोलन

Mumbai Measles : मशिदींमधून केली जाणार गोवर लसीकरणाची घोषणा

दोन टप्प्यात दिली जाणारी एफआरपी रक्कम बंद करून एका टप्प्यात एफआरपीचे पैसे मिळावेत, मागच्या हंगामातील ऊसाचे उर्वरित दोनशे रुपये द्यावेत तसेच केंद्र सरकारने पाच रुपयांचा अधिकचा भाव द्यावा अशा मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या मागण्यांसाठी साखर कारखाने आणि साखर आयुक्तांकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या मागण्या मांडल्या असून या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस तोड बंद आंदोलन पुकारले आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!