33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
HomeमनोरंजनBollywood : अटल बिहारींची भूमिका साकारणार पंकज त्रिपाठी; रवी जाधव करणार हिंदी...

Bollywood : अटल बिहारींची भूमिका साकारणार पंकज त्रिपाठी; रवी जाधव करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

बॉलीवूडमध्ये अनेक मराठी कलाकार, दिग्दर्शकांनी आपली मोहर उमटविली आहे. आता आणखी एक मराठी दिग्दर्शक बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट तो करणार आहे. या चित्रपटात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनाचे चित्रण असणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठी असणार आहे.

बॉलीवूडमध्ये अनेक मराठी कलाकार, दिग्दर्शकांनी आपली मोहर उमटविली आहे. आता आणखी एक मराठी दिग्दर्शक बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट तो करणार आहे. या चित्रपटात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनाचे चित्रण असणार आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत पंकज त्रिपाठी असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘मैं रहूं या न रहूं ये देश रहना चाहिए-अटल’ असे असणार असून मराठीतील धडाडीचा आणि प्रयोगशिल दिग्दर्शक रवी जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे अतिशय लोकप्रिय नेत्यांपैकी एक होते. विरोधी पक्षातील नेते देखील अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर करत असत. त्यांचे नेतृत्त्वात भारताने कारगीलचे युद्ध जिंकले, अणू बॉम्बची चाचणी करुन त्यांनी देशाचे सामर्थ्य जगभरात दाखवून दिले. ते एक कवी मनाचे, मृदू स्वभावाचे पण कणखर बाण्याचे नेते होते.
या चित्रपटामध्ये अटल बिहारी वायजेपयी यांची भूमिका पंकज त्रिपाठी हा कसलेला अभिनेता साकारणार आहे. तर या चित्रपटाचे मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव हे करणार आहेत. हा सिनेमा पेंग्विन रँडम हाऊस इंडिया प्रकाशनाच्या सर्वाधिक विकल्या गेलेल्या ‘द अनटोल्ड वाजपेयी: पॉलिटिशियन अँड पॅराडॉक्स’ या पुस्तकावर आधारित आहे. हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

पंकज त्रिपाठी हा एक कसलेला अभिनेता आहे. अत्यंत खडतर परिस्थित त्याने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्मान केले आहे. त्याला सुरूवातीच्या अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका मिळाल्या पण याच भूमिकांमधून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गॅंग्ज ऑफ वासेपूर, मसान या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका अतिषय दमदार झाल्या. तसेच ओटीटी माध्यमांवर देखील त्याने आपला चाहतावर्ग निर्मान केला आहे. मिर्झापूर, सिक्रेड गेम्स यासारख्या वेबसिरीजमधून त्यांने आपला ठसा उमटवला आहे.

हे सुद्धा वाचा :
Mumbai Measles : मशिदींमधून केली जाणार गोवर लसीकरणाची घोषणा

Chandrkant Patil : आम्हाला एकनाथजींची शिवसेना पूरेशी; उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

MNS Against Rahul Gandhi : राहूल गांधींच्या विरोधात मनसे आक्रमक; पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतले

तर रवी जाधव यांनी न्यूड, बालकपालक, नटरंग, बालगंधर्व अशा चिंत्रपटांचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अघाडीचा दिग्दर्शक असून 2009 साली आलेल्या त्याच्या नटरंग या सिनेमातून त्याने आपल्या कामाचे वेगळेपण दाखवून दिले. रवी जाधव यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासह अनेक पूरस्कार देखील मिळाले आहेत. एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांची ओळख आहे. बालगंधर्व या चित्रपटामूळे देथील त्यांच्या कामाचे मोठे कौतुक झाले होते. आता रवी जाधव अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आधारीत हिंदी सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी