टीम लय भारी
मुंबई: छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ लोकप्रिय शो आहे. सध्या ‘बिग बॉसचे १५’ वे पर्व सुरु आहे. सध्या शोमध्ये असलेली स्पर्धक अफसाना खान तिच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांच्या निशाण्यावर आहे. नेटकरी तिला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. दरम्यान, सलमान खाननेही अफसानावर टीका केली. मात्र, त्याचवेळी अफसाना असे काही बोलली की सलमानला प्रचंड राग आला. विकेंड का वारचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे (Bigg Boss 15: Salman gets angry with Afsana Khan).
‘बिग बॉस’चा हा प्रोमो कलर्स टीव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं आहे की सलमान अफसानाला खूप ओरडत बोलतो, “निर्लज्ज बाई कोण आहे आणि कोण नाही हे तू ठरवणार?” त्यावर अफसाना बोलते, “तुम्ही मोठे आहात.” अफसानाला मध्ये थांबवत सलमान बोलतो नाही “नाही मी पण म्हातारा आहे.”
शिल्पा शेट्टी-राज कुंद्राविरुध्द शर्लिन चोप्राची पोलिसांत तक्रार
Postal Life Insurance bond साठी घरबसल्या अर्ज कसा कराल; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया?
यावर स्पष्टीकरण देत अफसाना म्हणाली, “मी रागात होते.” पण सलमान तिचं ऐकत नाही आणि बोलतो, “रागात काहीही बोलणार? तुझं तोंड तर चालत त्यासोबत हात पण चालतात. तुझा एक सेट पॅटर्न आहे.” सलमानच्या या वक्तव्यांवर इतर स्पर्धक होकार देतात. शमिता बोलते की “अफसाना आधी दोष देते आणि नंतर स्वत: ला इजा करते.” इतर स्पर्धकांकडून अफसाना बद्दल ऐकल्यानंतर सलमान बोलतो, “माझी चॉइस असती तर मी तुला या शोमधून काढून टाकलं असतं.”
भारताच्या माजी कर्णधाराचे २९व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
हे ऐकल्यानंतर अफसाना माफी मागण्या ऐवजी बोलते, “मला काहीच अडचण नाही.” हे ऐकल्यानंतर सलमानला राग येतो. आता सलमान पुढे काय करणार? अफसाना सलमानची माफी मागेल की ती शो बाहेर जाईल ही आज आपल्याला पाहायला मिळणार आहे.