33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
HomeमनोरंजनDeepika Padukone Ranveer Singh : रणवीर दीपिका वेगळे होणार? अभिनेत्रीने स्पष्टचं सांगितले

Deepika Padukone Ranveer Singh : रणवीर दीपिका वेगळे होणार? अभिनेत्रीने स्पष्टचं सांगितले

गेल्या काही दिवसांपासून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना अस्वस्थ केले. आता पहिल्यांदाच दीपिकाने रणवीरपासून वेगळे होण्याच्या अफवेवर मौन सोडले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या विभक्त होण्याच्या बातमीने चाहत्यांना अस्वस्थ केले. एका ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे, त्यामुळे दीपिका-रणवीरने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि, या जोडीने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे या अफवा दूर केल्या. आता पहिल्यांदाच दीपिकाने रणवीरपासून वेगळे होण्याच्या अफवेवर मौन सोडले आहे. त्यामुळे आता दीपिकाने केलेल्या खुपलास्यानंतर या सर्व अफवांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रणवीर सिंगसाठी ही गोष्ट सांगितली
दीपिका पदुकोणने माजी अभिनेत्री मेघन मार्कल, डचेस ऑफ ससेक्ससह एक विशेष पॉडकास्ट रेकॉर्ड केला. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, दीपिकाने पॉडकास्टवर रणवीरबद्दल सांगितले की, जेव्हा तो परत येतो तेव्हा तिला खूप आनंद होतो. सध्या दीपिका तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये खूप व्यस्त आहे. नुकतेच तिने पॅरिस फॅशन वीकसाठी प्रसिद्ध ब्रँड लुई व्हिटॉनसाठी रॅम्प वॉक केला.

हे सुद्धा वाचा

Disha Vakani Throat Cancer : प्रेक्षकांच्या लाडक्या ‘दयाबेन’ला घश्याचा कॅन्सर! वाचा काय आहे खरी गोष्ट

Doctor G Special Screening : आयुष्मान खुराना अभिनित ‘डॉक्टर जी’च्या निर्मात्यांनी आयोजित केली डॉक्टर्ससाठी विशेष स्क्रीनिंग

T20 World Cup : बुमराह अन् चहरची जागा भरून काढण्यासाठी शामीसह आणखी दोन वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रवाना होणार!

दीपिकाला पाहताच रणवीरच्या चेहऱ्यावर हसू येते.
अभिनेत्रीने खुलासा केला आहे की ती आणि रणवीर कामामुळे बराच काळ घरापासून दूर आहेत. ‘माझे पती आठवडाभर संगीत मैफलीत होते आणि ते नुकतेच परतले आहेत. परतल्यावर माझा चेहरा पाहून त्याला खूप आनंद होईल.

अलीकडेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणमध्ये सर्व काही ठीक नसल्याची बातमी आली होती. दोन्ही अभिनेत्यांच्या लग्नात दुरावा निर्माण झाल्याचा दावा एका व्हायरल ट्विटनंतर झाला होता. तथापि, नंतर, रणवीरने असे संकेत दिले की अशा बातम्या केवळ अफवा होत्या, जिथे त्याने दीपिकासोबत 10 वर्षे एकत्र असल्याचे सांगितले होते. तो म्हणाला होता, ‘टचवुड… आम्ही भेटलो आणि 2012 मध्ये आम्ही डेटिंगला सुरुवात केली… त्यामुळे 2022 मध्ये दीपिका आणि माझ्यासाठी 10 वर्षे झाली.’

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर रणवीर सिंग ‘सर्कस’ या चित्रपटात पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘सर्कस’ व्यतिरिक्त तो करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

दुसरीकडे, दीपिका पदुकोणचे अनेक मोठे चित्रपट पाइपलाइनमध्ये आहेत. ती शाहरुख खानसोबत ‘पठाण’मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती तिच्या पुढच्या प्रोजेक्टची शूटिंग करत आहे ज्यात प्रभास आणि अमिताभ बच्चन देखील आहेत. ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्येही दीपिका दिसणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी