25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमनोरंजन55 वर्षांच्या दिप्ती भटनागरचे तरुणींना लाजवेल असे 'सौंदर्य'

55 वर्षांच्या दिप्ती भटनागरचे तरुणींना लाजवेल असे ‘सौंदर्य’

अभिनेत्री दिप्ती भटनागरचा आज 56 वा वाढदिवस. नव्वदच्या दशकातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तीने लौकिक कमावला होता. आजही ती तरुणींना लाजवेल अशी सुंदर दिसते, सोशल मीडियावर ती खुपच अॅक्टीव्ह असते. आज वाढदिवसानिमित्त तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारत तीने त्यांचे आभार देखील मानले आहेत.
Dipti Bhatnagar birthday photo looks beautiful

दिप्तीचा जन्म मेरठमध्ये झाला होता. ती तिच्या हस्तकलेच्या वस्तूंच्या प्रदर्शनासाठी 90 च्या दशकात मुंबईत आली. यावेळी तीला एका जाहिरातीसाठी विचारण्यात आले. त्यानंतर दिप्तीने जाहिरात क्षेत्रात पाऊल ठेवत, बॉलिवूड, टॉलीवूड देखील गाजवले. 90 दशकातील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.
Dipti Bhatnagar birthday photo looks beautiful

दिप्तीची दुसरी ओळख म्हणजे ती ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची सुन आहे. धर्मेंद्र यांचा चुलत भाऊ दिवंगत विरेंद्र यांचा मुलगा रणदीप आर्या यांच्यासोबत तीने विवाह केला. देओल कुटुंबाच्या अनेक कोटुंबिक कार्यक्रमात ती दिसून येते.
Dipti Bhatnagar birthday photo looks beautiful

दिप्ती भटनागरने वयाच्या 18 व्या वर्षी मिस इंडियाचा किताब पटकावला होता. त्यानंतर तीने काही वर्षे मोडेलिंग देखील केले. आज देखील दिप्ती कमालीची सुंदर दिसते. इन्टाग्रामवर ती नेहमी फोटो शेअर करत असते.
Dipti Bhatnagar birthday photo looks beautiful

फिल्मी दुनियेतून काहीशी दुर झाल्यानंतर दिप्तीने ‘यात्रा’ ही सिरीज केली. त्या सिरीजला देखील मोठा प्रतिसाद मिळाला. या सिरीजनंतर तीने अंतरराष्ट्रीय ट्रॅवल शो देखील केला. या शोच्या माध्यमातून तीने 90 देशांचा प्रवास केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepti Bhatnagar (@dbhatnagar)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी