29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रदिवाळीचा पहिला दिवस वसुबारस

दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस

भारतीय सणांमध्ये दिवाळीला हिंदू सणांचा राजा मानले जाते. आजपासून दिवाळी सणाला (Diwali Celebration) सुरुवात झाली आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस (vasubaras). या दिवशी घरातील गायवासरांची पूजा केली जाते. आपल्या धनधान्याचा पाया गायवासरांमुळे घातला जातो. त्यांच्यामुळेच शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक सुबत्ता येते. त्यामुळेच बसुबारसला खूप महत्त्व आहे. म्हणूनच दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. आजही शहरी भागात नरकचतुर्थीपासून दिवाळी साजरी केली जाते. मात्र, ग्रामीण भागात वसुबारसला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर वसुबारस (Vasubaras) म्हणजे गाय-वासरांच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम यांचा संगम असणारा दिवाळीतील दिवस होय. वसुबारसला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे गाई, बैल, रेडे यांना शेतकऱ्यांच्या लेखी खूप महत्त्व आहे. किंबहुना हे प्राणी ग्रामीण भागात कुटुंबाचा अविभाज्य भाग मानले जातात. वसुबारसच्या दिवशी ग्रामीण भागात विशेषकरून शेतकरी त्यांच्या गायवासरांची मनोभावे पूजा करतात. जसे बैलपोळ्याला बैलाची पूजा केली जाते, त्याला सजवले जाते, त्याचे लाड केले जातात. अगदी त्याचप्रमाणे वसुबारसच्या दिवशी गायवासरांची पूजा केली जाते. पंचांगानुसार रमा एकादशीला दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारस साजरा केला जातो. समुद्रमंथनाच्या वेळेस कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मातृत्व, देवत्व, प्रजनन, पालनपोषणाशी संबंध जोडला जातोय.

हे ही वाचा

Lalit Patil Drugs Case | ललित पाटीलच्या संपत्तीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई

अमरावतीमध्ये मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्याकडे सुपूर्द

बीएमसी, बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस कधी? आदित्य ठाकरेंचा महापालिका आयुक्तांना प्रश्न

अशी करावी पूजा

दिवाळी म्हटली की, दिव्यांची आरास आलीच शिवाय दारासमोर रांगोळीदेखील हमखास काढली जाते. याला वसुबारसचाही अपवाद नाही. शेतकरी मंडळी त्यांच्या गायवासरांची अंघोळ घालतात, त्यांची पूजा करतात (cow worship). शहरी भागात गायवासरू नसल्याने त्यांच्या छोट्या मूर्ती घेऊन त्यांची पूजा केली जाते. संध्याकाळी दाराभोवती, अंगणात पणत्या लावल्या जातात. हा दिवस आईमुलाच्या नात्यातील गोड दिवस आहे. यामुळे आई आपल्या मुलासाठी उपवास करते. हा उपवास बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खाऊन सोडला जातो. मुलाबाळांना आरोग्य मिळावे आणि शेतीत यश मिळावे यासाठी वसुबारस पूजा करण्याची प्रथा आहे.

वसुबारसचा मुहूर्त

बैलपोळ्याला जशी बैलाची पूजा केली जाते अगदी अशाच स्वरूपात ग्रामीण भागात गायवासराची सायंकाळी पूजा केली जाते. आज बसुबारसच्या पूजेचा मुहूर्त संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ९ मिनिटांपर्यंत आहे.  दसऱ्यानंतर कापणी होते आणि शेतकऱ्यांच्या हातात पैसे येतात. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदाने दिवाळी साजरी करत असतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी