33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजन'खिसा' सर्वोत्कृष्ट; तर लगाम, साईड मिररचा गौरव

‘खिसा’ सर्वोत्कृष्ट; तर लगाम, साईड मिररचा गौरव

टीम लय भारी

मुंबई : प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात ‘खिसा’ या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान पटकावला आहे. या लघुपटासाठी राज मोरे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले असून वेदांत क्षीरसागर याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा मान मिळवला आहे. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ हा लघुपट दुसऱ्या क्रमांकांचा तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ हा लघुपट तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला(Short film ‘Khisa’ is the best; the glory of the Lagam & side mirror).

‘प्रबोधन गोरेगाव’ च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने राज्याचे राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथे ल पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील प्रविण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा मान मिळाला, तर ‘वन्स ही डिड अटीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या महोत्सवात आलेल्या ७७ मराठी लघुपटांच्या प्रवेशिकांपैकी १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यातूनच सर्वोत्कृष्ट लघुपट निवडला गेला. यावेळी इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला(Taj Mahal won the award for best short film on social issues).

Short film 'Khisa' is the best; the glory of the Lagam & side mirror
लघुपटासाठी राज मोरे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले

प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे अध्यक्ष सुभाष देसाई याप्रसंगी बोलताना म्हणाले, “सर्वांनी हा लघुपट यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार. प्रबोधनच्या ५० व्या वर्धापनाचे औचित्य साधून काय करता येईल? याविषयी सर्व पदाधिका-यांसोबत चर्चा करताना, लघुपट महोत्सव करावा असे ठरले, आणि त्यासाठी एकमेव नाव होते ते म्हणजे ‘चित्रपट पाहिलेला माणूस’ अशोक राणे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे हा पहिला दर्जेदार महोत्सव प्रबोधनने यशस्वी केला. ज्यांनी ज्यांनी या महोत्सवात सहभाग घेतला त्या सर्वांचे कौतुक. एका चमकदार कल्पनेतून कलावंताला आपली प्रतिभा मांडता येते. आणि ‘प्रतिभा’ आहे म्हणून ‘प्रतिमा’ पुढे सादर करता येते. या सर्व प्रतिभासंपन्न कलावंतांचे आभार, त्यांच्या उदंड सहभागामुळे हा लघुपट महोत्सव विशेष झाला, आम्ही यापुढेही प्रत्येकवर्षी हा महोत्सव असाच सुरु ठेवणार असून कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने सर्व पुरस्कार वितरीत होतील.”

हे सुद्धा वाचा

लवकरच देहविक्री करणाऱ्या महिलांना मिळणार शिधापत्रिका

‘गुल्हर’चं म्युझिकल मोशन पोस्टर लाँच!

’83’ Movie | कपिल देव यांनी मदन लाल यांच्या रिव्हेंजची कहाणी केली शेअर

67th National Film Awards: Marathi Filmmakers And Actors Shine At The Prestigious Award

“टेक्नॉलॉजी येते, फॉरमॅट्स बदलतात, सगळं काही बदलतं, मात्र कलाकार तोच राहतो, थियटर मधून, टेलिव्हिजन, चित्रपटातून सतत वेगळ वेगळ पहात रहा. मी सर जे.जे.मध्ये फाईन आर्टसला असताना आम्हाला तेव्हा पाचही वर्षे प्रख्यात पेंटर प्रोफेसर प्रभाकर कोलते हे शिक्षक होते, त्यांनी आम्हाला आर्टिस्ट म्हणजे काय हे डिस्कवर करायला लावलं. खरंतर मला पेंटर व्हायचं आणि पॅरिसमध्ये स्वतःचा स्टुडीओ सुरु करायचा, असं सर्वकाही ठरलं होत. मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय चित्रपटांच एक्सपोजर पाहिलं आणि मी चित्रपटांकडे, त्यातील अभिनयाकडे आकर्षित झालो. कलाकार हा एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतो. हा फेस्टिव्हल सुद्धा तुमच्या जीवनात असाच असंच काहीतरी वेगळ घडवणार आहे. ‘प्रबोधन’.. सोबत जोडली गेलेली माणसे मुळात वेगळी आणि दिग्गज आहेत.” असे गौरन्वावित उद्गार समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी काढले.

करोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच कलावंत तंत्रज्ञांच्या उपस्थित पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या’ अंतिम फेरीचे आयोजन पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले होते. या प्रसंगी ’५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्याग ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील प्रमुख अभिनेते जितेंद्र जोशी यांचा विशेष सन्मान होणार होता मात्र जितेंद्र जोशी करोनाग्रस्त असल्याने त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांशी संवाद साधला.

महोत्सवातील पुरस्कार विजेते लघुपट

‘खिसा’ सर्वोत्कृष्ट लघुपट – प्रथम पुरस्कार
रु. ७५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘लगाम’ सर्वोत्कृष्ट लघुपट – द्वितीय पुरस्कार
रु. ५०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘साईड मिरर’ सर्वोत्कृष्ट लघुपट – तृतीय पुरस्कार
रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

‘ताजमहाल’ सर्वोत्कृष्ट लघुपट सामाजिक लघुपट
(रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)

कान्स, ओबरहौसेन जर्मनी, कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी निवड झालेले लघुपट

१. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ
२. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर
३. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव
४. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे
५. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे

सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरीश बारस्कर – (ताजमहाल)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राज मोरे – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट पटकथालेखक – कैलास वाघमारे – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार – किरण जाधव – (लगाम)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री दीक्षा सोनावणे – (वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – वेदांत क्षीरसागर – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट संकलक मयुरेश वेंगुर्लेकर – (बटर चिकन)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट ध्वनि – अनमोल भावे – (अर्जुन)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)+

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी