मनोरंजन

तरूणांनो स्वप्ने पाहा: ऑफिस बॉय ते मेन हीरो; TDM नायकाचा थक्क करणारा प्रवास

राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची सध्या जबरदस्त चर्चा आहे. ‘ख्वाडा’ आणि ‘बबन’च्या यशानंतर भाऊराव यांचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तो म्हणजे ‘टीडीएम’. या अनोख्या नावाच्या चित्रपटाच्या प्रेक्षकांची भलतीच उत्सुकता वाढवली आहे. चित्रपटातील एकापेक्षा एक गाणी आणि मनोरंजनाचा गावरण तडका. भाऊराव यांना नुकतेच दिशा सोशल फाऊंडेशन तर्फे दिशाकार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्या प्रसंगी मुख्य अभिनेता पृथ्वीराजने आपले मनोगत व्यक्त करत तरूणांना स्वप्नं पाहण्याचं आवाहन केले आहे.

या चित्रपटात दोन नवे चेहरे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. कालिंदी ही पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती. हिरोईन वगैरे व्हायचा विचार तिने स्वप्नातही  केला नव्हता. रूममेटकडून तिला चित्रपटाबद्दल कळलं. मग रूममेटच्या आग्रहाखातर तिने फोटो पाठवला. यानंतर तिची स्क्रीनटेस्ट झाली. ऑडिशन झाली. यानंतर अनेक दिवसानंतर तिला तिचं सिलेक्शन झाल्याचं कळलं. पृथ्वीराजची स्टोरी तर याहूनही भन्नाट आहे.

या सिनेमाचा नायक पृथ्वीराजची स्टोरी एकदम भन्नाट आहे. पृथ्वीराज आधी गावाकडे शेती करायचा. पण सिनेमाची आवड होती. मुंबईत फिल्म सिटीत काही काम मिळतं का, दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते. भाऊराव कऱ्हाडे यांच्या ख्वाडा सिनेमाचं शूटींग सुरू असताना पृथ्वीराज असाच सहज म्हणून सेटवर गेला होता. भाऊराव व त्याची काहीही ओळख नव्हती. बबन या चित्रपटाच्या वेळी त्याने भाऊराव यांना गाठलं. मला प्रॉडक्शनला तरी काम द्या, असं तो म्हणाला.

भाऊराव यांनी त्याला प्रॉडक्शनला काम दिलं. बबनच्या हिरोचा बॉय म्हणून पृथ्वीराजने काम केलं. बबनचं शूट संपल्यानंतर सगळे पुण्याला पांगले. पृथ्वीराज मात्र गावाला परतला. पण तिथे त्याला स्वस्थ बसवेना. तो पुन्हा भाऊराव यांच्याकडे गेला आणि मला काम द्या, मी काहीही करायला तयार आहे, असं म्हणत त्याने पुन्हा विनंती केली. भाऊराव यांनी त्याला ऑफिस बाॅय म्हणून काम दिलं.

पृथ्वीराज त्यांच्याकडे ऑफिस बॉय म्हणून काम करू लागला. हा ऑफिस बॉय भाऊरावांच्या सिनेमाचा हिरो बनेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खुद्द पृथ्वीराजनेही तशी अपेक्षा केली नव्हती. पण पृथ्वीराजमध्ये असे काही गुण होते की, हाच आपला हिरो यावर भाऊराव ठाम होते. तू तयारी कर, असं त्यांनी पृथ्वीराजला सांगितलं. आपल्याला छोटीमोठी भूमिका मिळेल, अशी पृथ्वराजची अपेक्षा होती. पण तूच लीड भूमिका करताय, असं त्याला सांगितलं गेलं, तेव्हा क्षणभर त्याचाही विश्वास बसेना. सर आपली फिरकी घेत आहेत, असंच त्याला वाटलं. पण भाऊराव यांना पृथ्वीराजमध्ये वेगळं काही दिसलं होतं. त्यामुळे त्यांनी त्याला हिरो म्हणून निवडलं.

हे सुद्धा वाचा :

भाऊराव कऱ्हाडे यांचा गावराण तडका; ‘टीडीएम’ चित्रपटात पिंगळा गाणार शिवरायांची गाथा

भाऊराव कऱ्हाडेंच्या टीडीएम चित्रपटात ‘एक फुल’ रोमॅंटिक गाण्याची मेजवानी

तब्बल 30 वर्षानंतर ‘माहेरची साडी’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला

विशेषतः सिनेमात फक्त 2 मिनिटांचा का होईना एखादा लहानसा रोल मिळावा, अशी त्याची इच्छा होती. पण पृथ्वीचं नशीब इतकं जोरदार की, त्याला 2 तासांचा अख्खा सिनेमा मिळाला. भाऊराव कऱ्हाडे यांनी याच पृथ्वीराजचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत पृथ्वीराज तरूणांना स्वप्नं पाहण्याचं आवाहन करतोय. स्वप्न पाहिली पाहिजे, ती खरी नक्कीच होतात, असं त्याने म्हटलं आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

3 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

3 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

3 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

4 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

6 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

7 hours ago