30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeमनोरंजनतब्बल 30 वर्षानंतर 'माहेरची साडी'चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला

तब्बल 30 वर्षानंतर ‘माहेरची साडी’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला

माहरेची साडी हा अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांपैकी आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने प्रत्येक गृहिणीला आपल्याश्या वाटणाऱ्या आणि प्रत्येकाच्याच मनात आपली जागा निर्माण करणाऱ्या माहेरच्या साडीचा दूसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. मराठी चित्रपटांचे दुसरे भाग असणारे असे चित्रपट खूप कमी आहेत. जे मूळ गोष्टीला अनुसरून बनविले जातात किंवा मूळ चित्रपटाच्या कल्पनेवरून तयार केले जातात. आता मात्र तब्बल 30 वर्षानंतर येणाऱ्या माहेरच्या साडीच्या दुसऱ्या भागाची आतुरता सर्वांनाच लागली आहे.

राज्यात प्रत्येकाच्या घरोघरी पोह्चलेला चित्रपट म्हणजे माहेरची साडी (Maherchi Saadi) अगदी शहरापासून ते थेट ग्रामीण भागातील महिलांनी हा चित्रपट बघण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली होती. 1999 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. 90च्या दशकातील या चित्रपटाने लोकप्रियतेचा आणि उत्पन्नाचा उच्चांक गाठत इतिहास लिहिला होता. मराठी रसिकांच्या मनावर विशेषतः महिला रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत चर्चा रंगली आहे.

झी मराठीच्या अवॉर्डच्या सोहळ्यात अलका कुबल यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.यावेळी त्यांना माहेरची साडी 2 मध्ये आता त्या सासूच्या भूमिकेत सुनेचा छळ करताना दिसणार का असा मिश्किल प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी मला देखील या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असल्याचे कळले आहे. अजुन त्याविषयी अधिक माहिती नाही. असे अलका यांनी सांगितले होते.

माहेरची साडी यामध्ये अलका कुबल यांनी सुनेची भूमिका केली होती. त्यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणात कौतूकही झाले होते. मराठी प्रेक्षकांनी अलका कुबल यांची प्रशंसा केली होती. त्या चित्रपटानं अलकाजी घराघरात ओळखल्या जाऊ लागल्या होत्या. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय झाली होती. विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, रमेश भाटकर, विजय चव्हाण, जयश्री गडकर, भालचंद्र कुलकर्णी, जयराम कुलकर्णी, उषा नाडकर्णी, अजिंक्य देव यांच्या भूमिका होत्या.

हे सुद्धा वाचा:

सिनेमा सिक्वेलपेक्षा सीझनचा बोलबाला

अमृता खानविलकर म्हणते, ‘ललिता बाबर’चा चित्रपट हा माझा सर्वोच्च सन्मान

भाऊराव कऱ्हाडे यांचा गावराण तडका; ‘टीडीएम’ चित्रपटात पिंगळा गाणार शिवरायांची गाथा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी