31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रभारताचे माजी महान धावपटू 'फ्लाईंग शिख' मिल्खा सिंग यांचे निधन

भारताचे माजी महान धावपटू ‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

टीम लय भारी

मुंबई :-  आपल्या कर्तृत्वाने जगभरात देशाचे नाव लवखिख करणारे भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांची काल रात्री प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना कोरोनाची लागण झाली होती. मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी काल रात्री अखेरचा श्वास घेतला.

मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाल्यानंतर त्यांची परिस्थिती स्थिर झाली होती असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. त्यांचा कोरोना अहवाल ही निगेटिव्ह आला होता. पण अचानक त्यांची तब्येत नाजूक झाली त्यांनतर त्यांना चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयातमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मिल्खा सिंग (Milkha Singh) यांच्यावर अंतिम संस्कार आज सायंकाळी 5 वाजता चंदीगड सेकटर 25 येथे होणार आहे. अखेरच्या दर्शनासाठी त्यांचे पार्थिव आज दुपारी 3 वाजता त्यांच्या घरी ठेवले जाईल. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांचे पत्नीचे कोरोनाने निधन झाले होते.

हैदराबाद ते मुंबई, व्हाया नांदेड-औरंगाबाद; बुलेट ट्रेनसाठी चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

उद्योग मंत्री सुभाष देसाईंची मोठी कामगिरी, अमेरिकन कंपनी राज्यात गुंतवणार २ हजार कोटी

मिल्खा सिंग यांनी 19व्या दशकात आपल्या कर्तृत्वाने आंतराष्ट्रीय स्तरावर भारताकडे बघण्याची दृष्टि बदलली होती. त्या काळी मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी जे यश मिळवले त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी करू शकत नाही. मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचा क्रीडा विश्वात चांगलाच दबदबा होता. भारतासाठी त्यांनी बरीच आंतराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकली होती. सुवर्णपदक जिंकून आल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची भेट घेतली आणि विचारले मिल्खा सिंग (Milkha Singh) तुमच्यासाठी देश काय करू शकेल त्यावेळी मिल्खा सिंग (Milkha Singh) यांनी संपूर्ण देशात एका दिवसाची सुट्टी मागितली होती.

Flying Sikh Milkha Leaves For Heavenly Abode. Cremation At 5 pm Today | Updates

मिल्खा सिंग (Milkha Singh) यांना 3 जून रोजी पीजीआयएमआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, 13 तारखेपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होता. अखेरीस त्यांचा कोरोना अवाहल निगेटिव्ह आला होता. त्यांची परिस्थिती स्थिर झाली होती.

पण, अचानक त्यांची तब्येत नाजूक झाली, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तिथे त्यांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी सर्व प्रयत्न करूनही ते गंभीर अवस्थेतून बाहेर येऊ शकले नाहीत आणि 18 जून रोजी रात्री 11.30 वाजता त्यांचे निधन झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी