29 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeराजकीयविलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात आणि कोकरू!

विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात आणि कोकरू!

टीम लय भारी

मुंबई :- बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे विलासराव देशमुखांच्या (Vilasrao Deshmukh) खूप जवळचे आणि विश्वासू व्यक्तीमत्त्व होते. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे कृषीमंत्री होते. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे कार्यकर्ते विशाल काळे यांनी विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आणि बाळासाहेब थोरात यांचा त्या काळातील फोटो ट्टिवर पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) कृषी मंत्री असताना सर्व कृषी विद्यापीठांत शिवार फेरीचे आयोजन केले होते. त्यांच्या या संकल्पनेला विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांनी पांठिबा दिला होता. बाळासाहेब थोरातांचा (Balasaheb Thorat) हा उपक्रम तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता. विशाल काळे यांनी ट्टिवर पोस्ट केलेला फोटो हा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील आहे. या पोस्ट केलेल्या फोटोत त्यांची किती घनिष्ट मैत्री आहे दिसून येते. या फोटोत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आहेत. परंतु विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या हातात कोकरू आहे. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) आणि बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे त्या कोकरूला (Kokru) बघत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आले आहे.

भारताचे माजी महान धावपटू ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांचे निधन

संजय राऊतांच्या वक्तव्यांवर बाळासाहेब थोरांताची प्रतिक्रिया

Coronavirus: India reports 60,753 new cases, with active infections at lowest in 74 days

विशाल काळे यांनी हा फोटो शेअर करताना म्हटले आहे की, आठवणी साहेबांच्या… @bb_thorat जेव्हा कृषीमंत्री होते, तेव्हा त्यांनी सर्व कृषी विद्यापीठांत शिवार फेरीचे आयोजन केले होते. साहेबांच्या या संकल्पनेला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे मोठे पाठबळ होते. हा उपक्रम खुप गाजला. पोस्ट केलेला फोटो हा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील आहे.

विलासराव देशमुखांचा मोबाईल कार्यान्वित

विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) हे मुख्यमंत्री असताना त्यांना दिवसभरात हजारो लोकांचे फोन येत होते. तरी सुध्दा ते स्वत: फोन घेऊन जनतेसोबत संवाद साधत होते. जनतेच्या काय समस्या आहेत ते स्वत: जाणून घेत होते आणि त्या समस्या सोडवत होते. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे १४ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले. परंतु आज देखील त्यांना फोन केला तर त्यांचा फोन चालू आहे आणि फोन केल्यानंतर फोन उचला की, त्यांची जुनी भाषणे आपल्या ऐकू येतात. ते भाषण ऐकताना असे वाटत की विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) अजून आपल्यात आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी