35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयशरद पवारांवर आरोप करण्यासाठी गोपीचंद पडळकर, महादेव जानकर हे फडविणासांनी वापरलेले नेते...

शरद पवारांवर आरोप करण्यासाठी गोपीचंद पडळकर, महादेव जानकर हे फडविणासांनी वापरलेले नेते : उत्तमराव जानकर

टीम लय भारी

सोलापूर : शरद पवारांवर आरोप केला की, मोठे होता येते. ही बाब ध्यानी घेऊन गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) आणि महादेव जानकर या दोघांचा देवेंद्र फडणवीस यांनी वापर केला आहे ( Devendra Fadnavis used to Mahadev Jankar and Gopichand Padalkar ). परंतु पडळकर व जानकर हे दोन्हीही नेते सुमार दर्जाचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांनी केला आहे.

Mahavikas Aghadi

हे सुद्धा वाचा

गोपीचंद पडळकरांचा सन्मान करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकाची राष्ट्रवादीतून हकालपट्टी, ‘लय भारी’चा इम्पॅक्ट

गोपीचंद पडळकरांनी टीका केली ते बरेच झाले, पवारांचा ‘खरा’ चेहरा समोर आला

गोपीचंद पडळकरांची भूमिका ‘मोडेन पण वाकणार नाही’

गोपीचंद पडळकर – शरद पवार वादाच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटेंचे भाजपवर खळबळजनक आरोप

कै. गोपीनाथ मुंडे हे सुद्धा शरद पवारांवर आरोप करून मोठे झाले. परंतु कै. मुंडे यांचे कर्तृत्व व वकुब मोठा होता. ते लोकप्रिय नेते होते ( Gopinath Munde was mass leader ). त्यामुळे कै. मुंडे लोकप्रिय झाले होते. परंतु पडळकर व जानकर हे सुमार दर्जाचे ( Gopichan Padalkar and Mahadev Jankar hasn’t mass leaders ) आहेत. त्यांना कसलीही लोकमान्यता नाही.

जानकर यांना स्वतःचा मतदारसंघ सुद्धा नाही. फडणवीसांनी त्यांना वापरून घेतले व त्या बदल्यात मंत्रीपदाचा तुकडा टाकला.

MoneySpring

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांविषयी वादग्रस्त ( Gopichand Padalkar’s controversial statement on Sharad Pawar ) वक्तव्य केल्यानंतर त्यांचे काही कार्यकर्ते समर्थनार्थ आंदोलन करीत आहेत. पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करीत आहेत. पण त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही.

गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून धनगर व मराठा समाजामध्ये कलह निर्माण करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा डाव होता. पण हा डाव फसल्याचा टोलाही उत्तमराव जानकर यांनी हाणला आहे.

शरद पवारांवर आरोप करण्यासाठी गोपीचंद पडळकर, महादेव जानकर हे फडविणासांनी वापरलेले नेते : उत्तमराव जानकर

आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर पडळकर यांनी दिल्लीला धडक द्यायला हवी. गुर्जरांनी ज्या प्रमाणे आंदोलन केले होते, तसा रेल्वे रोको करायला हवा. संसदेत घुसून आंदोलन करावे लागेल. दुग्धाभिषेक करून आरक्षण मिळणार नाही, अशा शब्दांत उत्तमराव जानकर ( Uttam Jankar scathing to Gopichand Padalkar ) यांनी टोला हाणला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी