31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजLockdown : जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय नो एंट्री!

Lockdown : जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय नो एंट्री!

टीम लय भारी

सातारा :  राज्यसरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाउनमध्ये वाढ केली आहे. काही निर्बंध शासनाकडून शिथील केले जात असले तरी जिल्ह्यांच्या सीमांवर पासशिवाय प्रवेश करता येणार नाही. असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आषाढी एकादशीच्या दिवशी मानाच्या नऊ पालख्या पंढरपूरला पोहोचविण्याचे नियोजन केले आहे. वातावरणाचा अंदाज घेऊन हवाई किंवा जमीन मार्गाने पालख्या पोचविण्यात येतील असे देशमुख म्हणाले. तसेच पुढील वारी ही पूर्वी प्रमाणाचे व्हावी याबाबत विठ्ठलाला साकडं घातलं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संस्थात्मक विलगीकरण वाढविणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

लॉकडाउनंतर शिथिलता दिल्यामुळे उद्योग सुरु झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय परत राज्यात येत आहेत. कोरानाचे संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाबत दक्षता घ्यावी. फलटण आणि जावळी तालुक्यात करोनाबाधितांच्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे. तो दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी गृहमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी