32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeव्हिडीओGovernor : शरद पवारांच्या नाराजीनंतरही राज्यपालांनी केली मुख्यमंत्र्याच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी

Governor : शरद पवारांच्या नाराजीनंतरही राज्यपालांनी केली मुख्यमंत्र्याच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी

टीम लय भारी

मुंबई : राज्यपाल  ( Governor ) भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारक्षेत्रात घुसखोरी करीत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये समांतर यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी नाराजी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गेल्या महिन्यात व्यक्त केली होती.

शरद पवार यांच्या या नाराजीनंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor ) यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारक्षेत्रात आज घुसखोरी केलीच. ‘कोरोना’च्या नावाखाली कोश्यारी यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजभवनवर पाचारण केले.

Governor
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

‘कोरोना’च्या स्थितीचा राज्यपालांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला, व काही सुचनाही केल्या.

राज्यपालांनी बोलाविलेल्या या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. परंतु ठाकरे या बैठकीसाठी उपस्थित नव्हते. राज्यपालांनी अशी बैठक बोलाविणे संकेतला धरून नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहीले नसावेत अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

राजभवन हा भाजपचा अड्डा झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करणारा हा प्रकार लोकशाहीची पायमल्ली करणारा आहे.

– नवाब मलीक, मुख्य प्रवक्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस

लोकशाही पद्धतीने सत्तेवर आलेले सरकार चालविण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असते. राज्यपाल ( Governor ) हे केवळ नामधारी राज्यप्रमुख असतात. सरकारने केलेल्या सुचनांच्या आधारे राज्यपालांना ( Governor ) भूमिका बजवावी लागते. परंतु लोकनियुक्त सरकारच्याच अधिकारात घुसखोरी करून राज्यपालांनी ही बैठक बोलविली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्यपालांच्या बैठकीत काय झाली चर्चा ?

राज्यापुढील करोना विषाणू संसर्ग जून जुलैमध्ये वाढेल असा अंदाज या बैठकीत व्यक्त करण्यात आला.  या आव्हानाच्या अनुषंगाने राज्याच्या विविध विभागांच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.

जून व जूलै महिन्यातील करोना बाधितांची संभाव्य संख्या विचारात घेऊन संपूर्ण राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करताना बिगर कोरोना रुग्णांची गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी  घेण्याची सूचना राज्यपालांनी ( Governor ) यावेळी केली.

मुंबईतील कंटेनमेंट क्षेत्रासाठी काय उपाय योजना केल्या जात आहेत याची राज्यपालांनी माहिती घेतली.

राज्यात एकूण वैदयकीय अधिकारी, नर्सेस, आरोग्य सेवक, इस्प‍ितळातील उपलब्ध खाटा यांची एकत्रित माहिती देणारा डॅशबोर्ड तयार करण्याची राज्यपालांनी ( Governor ) यावेळी सूचना केली.

‘कोरोना’ विरूद्धच्या लढाईत आघाडीवर राहून कार्य करणाऱ्या स्वच्छता कर्मचारी, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस यांना प्रोत्साहन देण्याबाबत शासनाने विचार करावा अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

राज्यातून मजूरांचे स्थलांतर व स्थलांतरितांसाठी सुरू केलेल्या शिबिरांची सद्यस्थिती याचा देखील राज्यपालांनी आढावा घेतला.

यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल तसेच आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास यांनी सादरीकरण केले.

बैठकीला मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, सीतराम कुंटे, मनोज सौनिक, नितीन करीर व पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल तसेच शासनाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

अजितदादांनी भाजपला फटकारले

Politics : महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन : बाळासाहेब थोरात

Coronavirus : कोरोनाच्या नावाखाली नगराध्यक्ष करताहेत स्वत:च्या हॉस्पिटलची जाहिरात

Governors should not bypass CMs in giving instructions: Pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी