35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रउद्धव ठाकरे पोहोचणार मुंब्र्यात ! मुंब्र्याला पोलिस छावणीचे स्वरूप

उद्धव ठाकरे पोहोचणार मुंब्र्यात ! मुंब्र्याला पोलिस छावणीचे स्वरूप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) थोड्याच वेळात मुंब्रा येथे पोहोचणार (Uddhav Thackeray in Mumbra) असून मुंब्र्यातील पाडण्यात आलेल्या शिवसेना शाखेला भेट देऊन ते कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. उद्धव ठाकरे येणार असल्याने शिंदे गटाचे (Shivsena Shinde Camp) कार्यकर्तेही मुंब्र्यात जमले असून मुंब्र्यात प्रचंड तणावाची परिस्थिति निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त (Mumbra Police Deployed) ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंब्र्याला एखाद्या छावणीचसारखे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुंब्र्यात दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले असून आता उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज शनिवारी, (11 नोव्हेंबर) शिवसेना (उबाठा) (Shivsena UBT) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांबरोबर सायंकाळी चारच्या सुमारास मुंब्रा येथे भेट देणार आहेत. मुंब्रा येथील शिवसेना शाखा बुलडोजरच्या सहाय्याने पाडण्यात आल्याने उद्धव ठाकरे तेथे जाऊन शिवसैनिकांना भेट देणार आहेत. मुंब्रा येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेवरून शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटात वाद झाला होता. या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने शाखा जमीनदोस्त केली होती. ही शाखा ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी बांधली होती. पण, ती शाखा नक्की कोणाची? या वादातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ती पाडली. तसेच, शिंदे गटाने तेथे पुन्हा नवीन शाखा बनविण्यासाठी भूमिपूजनदेखील केले होते. आज उद्धव ठाकरे मुंब्रा येथे भेट देणार असून त्यापूर्वीच ठाण्यातील वातावरण तापले आहे.


त्यातच, उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले बॅनर्स अज्ञात व्यक्तींनी फाडल्यामुळे वातावरण अजूनच तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र त्यातील अनेक बॅनर्स हे फाडण्यात आल्याचे समोर आले होते. मुंब्रा ते ठाणे भागात रस्त्याच्या दुतर्फा बॅनरबाजी करण्यात आली होती. पक्षप्रमुख स्वतः मुंब्रा येथे येऊन वादग्रस्त शाखेला भेट देणार असल्याने ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्येही उत्साह आहे. पण, बॅनर्स फाडल्याचे समोर येताच ठाणे-मुंब्रा भागातील वातावरण अजूनच तापले आहे.

हे ही वाचा 

‘गुजरातीऐवजी मराठी पंतप्रधान करून दाखवा’

मनसेला यश, अमित ठाकरे ‘हे’ गाव घेणार दत्तक

अनुसूचित जातीचे तुकडे पाडण्यासाठी नरेंद्र मोदींची जंगी सभा !

उद्धव ठाकरे येणार असल्याने मुंब्र्यात ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यापासून मुंब्र्यापर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मुंब्र्यात 500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त, पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्यासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याचबरोबर, 3 एसआरपीएफच्या तुकड्या, 2 दंगल नियंत्रण पथक, 3 डीसीपी, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी