33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यसंयुक्त राष्ट्रांकडून धोक्याचा इशारा, बदलणा-या प्रत्येक मोसमात कोरोना पुन्हा पुन्हा येणार

संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याचा इशारा, बदलणा-या प्रत्येक मोसमात कोरोना पुन्हा पुन्हा येणार

टीम लय भारी

मुंबई : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ३५ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यातले तब्बल २५ हजारांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अनेक भागांत पुन्हा निर्बंध लागू केले गेले आहेत. काही भागांत लॉकडाऊन करावा लागला आहे. एका बाजूला कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसऱ्या बाजूला लसीकरणाचा वेगदेखील वाढवला जात आहे. मात्र संयुक्त राष्ट्रांकडून (UN) दिलेल्या कोरोना पुन्हा पुन्हा येणारच या एका गंभीर इशाऱ्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे.

कोरोना आता एका हंगामी आजाराच्या स्वरुपात विकसित होऊ शकतो, असा इशारा संयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आला दिला आहे. ‘कोरोना संकट पुढील काही महिने कायम राहिला, तर मग तो एका हंगामी आजाराच्या रुपात स्वत:ला विकसित करेल. चीनमध्ये कोरोना विषाणू आढळून आल्याच्या घटनेला वर्षभरापेक्षा अधिक कालावधी होऊन गेला आहे. या कालावधीत कोरोनाची लसदेखील आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे,’ असे संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे.

कोरोना विषाणूने हंगामी आजाराचे स्वरुप धारण केल्यास बदलणा-या प्रत्येक मोसमात लोकांना त्याच्याशी दोन हात करावे लागतील, असा इशारा यूएनने दिला आहे. संघटनेच्या एका टीमने कोरोनाचा प्रसार आणि त्यासाठी अनुकूल असणारं वातावरण यासंदर्भात अभ्यास केला. यातून कोरोना विषाणू एक हंगामी आजार म्हणून विकसित होऊ शकेल अशी माहिती समोर आली. श्वासाशी संबंधित विषाणूचा प्रादुर्भाव बहुतेकदा हंगामी असतो. अनुकूल वातावरणात असे आजार हातपाय पसरतात, असे निरीक्षण यूएनच्या १६ सदस्यीय टीमने संशोधनानंतर नोंदवले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी