33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeआरोग्यहसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे:जागतिक हास्य दिन

जागतिक हास्य दिन दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा दिवस 5 मे रोजी साजरा केला जातोय.सध्याच्या काळात लोक ताण-तणावाला सामोरे जातात. हसण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नसली तरी जीवनशैली आणि काम यात समतोल राखताना आपण हसणं विसरून जातो. अशा परिस्थितीत आपल्या दैनंदिन जीवनात हास्य आणि हास्याचं महत्त्व सांगण्यासाठी 'जागतिक हास्य दिन' साजरा केला जातो.या दिवशी देश-विदेशात विविध प्रकारच्या विनोदी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. 'जागतिक हास्य दिन' ची थीम लोकांना हसत आणि आनंदी ठेवण्यावर भर देते.

जागतिक हास्य दिन ( World Laughter Day) दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. यंदा हा दिवस 5 मे रोजी साजरा केला जातोय.सध्याच्या काळात लोक ताण-तणावाला सामोरे जातात. हसण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नसली तरी जीवनशैली आणि काम यात समतोल राखताना आपण हसणं विसरून जातो. अशा परिस्थितीत आपल्या दैनंदिन जीवनात हास्य (laughter) आणि हास्याचं (laughter) महत्त्व सांगण्यासाठी ‘जागतिक हास्य दिन'( World Laughter Day) साजरा केला जातो.या दिवशी देश-विदेशात विविध प्रकारच्या विनोदी स्पर्धांचं आयोजन केलं जातं. ‘जागतिक हास्य दिन’ ची थीम लोकांना हसत आणि आनंदी ठेवण्यावर भर देते.(Health benefits of laughter: World Laughter Day)

प्रत्येक गोष्ट हसतमुखानं केल्यानं आयुष्य तर चांगलं होतंच. पण अनेक आजारही आपोआप नाहीसे होतात. मानसशास्त्रीय प्रयोगातून असं दिसून आलंय की, जी मुलं जास्त हसतात ती अधिक हुशार असतात. प्रत्येकाच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हसणं फार महत्त्वाचं आहे.

जागतिक हास्य दिनाचा इतिहास : जागतिक हास्य दिनाची सुरुवात भारतात झाली. 10 मे 1998 रोजी मुंबईत पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. जागतिक हास्य दिनाची सुरुवात हास्य योग चळवळीचे संस्थापक डॉ. मदन कटारिया यांनी केली. तेव्हापासून दरवर्षी मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश हसण्याद्वारे लोकांमध्ये परस्पर प्रेम वाढविणं हा आहे.

हसण्याचा आरोग्याला मिळणारे फायदे
हसणं केवळ तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं नाही तर ते काही प्रमाणात तुमचं व्यक्तिमत्त्वही ठरवतं. तुम्ही खूप हसत असाल तर याचा अर्थ तुम्ही आयुष्यात सकारात्मक आहात. हसण्यामुळं तुमच्या शरीरात एंडोर्फिन तयार होतात जे शरीरात नैसर्गिक वेदना कमी करणारे असतात. हृदय निरोगी ठेवण्यासाठी हसणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमच्या पोटाचे स्नायू विस्तारतात आणि आकुंचन पावतात. याशिवाय हास्य हे तुमच्या स्ट्रेस हार्मोन्सची पातळी कमी करते.

तणाव कमी करते : हसण्यामुळं कॉर्टिसॉल सारखे तणावाचे संप्रेरक कमी होतात.

रोग प्रतिकारशक्ती वाढते : हसण्यामुळं अँटीबॉडीजचं उत्पादन वाढतं आणि रोगप्रतिकारक पेशी सक्रिय होतात. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

वेदनांपासून आराम : हसताना एन्डॉर्फिन सोडले जातात हे नैसर्गिकपणे वेदना कमी करण्यास मदत करतात

मनःस्थिती सुधारते : हसण्यामुळं मेंदूतील एंडोर्फिन, रसायनं बाहेर पडतात ज्यामुळं आनंद आणि उत्साहाची भावना निर्माण होते.

उत्पादकता वाढवते: हास्यामुळं कामाच्या ठिकाणी उत्पादकता आणि टीमवर्क वाढू शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी