33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्राईमसप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

सप्तशृंग गडावरुन उडी घेत युगलाची आत्महत्या

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे. वणी गडाच्या शीतकड्यावरुन सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेवून एका तरुणाने आणि अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगेश राजाराम शिंदे, वय २४ वर्ष रा. भायाळे ता. चांदवड जि. नाशिक आणि प्रियंका संतोष तिडके वय १६ वर्ष रा. वडनेरभैरव ता. चांदवड जि. नाशिक अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत.

आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी सप्तशृंग गडाच्या (Saptashringa Gada) शीतकड्यावरुन धक्कादायक घटना समोर आली आहे. वणी गडाच्या शीतकड्यावरुन सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेवून एका तरुणाने आणि अल्पवयीन मुलीने आत्महत्या ( suicide) केल्याची घटना घडली आहे. मंगेश राजाराम शिंदे, वय २४ वर्ष रा. भायाळे ता. चांदवड जि. नाशिक आणि प्रियंका संतोष तिडके वय १६ वर्ष रा. वडनेरभैरव ता. चांदवड जि. नाशिक अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत.(Yugal commits suicide by jumping off Saptashringa Gada)

मंगेश शिंदे आणि प्रियंका तिडके हे मोटर सायकल क्र. MH-15-HJ-5915 वरुन वडनेर भैरव ता. दिंडोरी जि. नाशिक येथून २८ एप्रिल रोजी सप्तश्रृंगी गडावर आले होते. सप्तशृंगी गडावर अज्ञात कारणाने या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शीतकडा येथे येवून सुमारे चारशे ते पाचशे फूट खोल दरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे.

शीतकड्यावरुन उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह झाडाला अडकलेला अवस्थेत होता. तर मुलाचा मृतदेह दरीत कोसळलेला आढळला. दोघांनी आत्महत्या केलेल्या घटनेला साधारण सहा दिवस होऊन गेले होते. त्यामुळे दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. याबाबत भातोडे, ता. दिंडोरीचे पोलीस पाटील विजय चव्हाण यांना गुराख्यांनी दोन मृतदेह दिसल्याची वणी पोलिसांत माहिती दिली. वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड अशी दरी चढून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. सदर तरुण आणि तरुणीचे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी