35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeआरोग्य‘करोना’बाबतच्या खोट्या मेसेजमुळे सरकारपुढे डोकेदुखी

‘करोना’बाबतच्या खोट्या मेसेजमुळे सरकारपुढे डोकेदुखी

टीम लय भारी

मुंबई : ‘करोना’बाबत खोटे मेसेज, अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यास राज्य सरकारने सुरूवात केली आहे. तरीही अनेक खोडसाळ व्यक्ती खोटे मेसेज तयार करीत आहेत. ‘हे मेसेज खोटे आहेत’ असे सांगण्यासाठी राज्य सरकारला कसरत करावी लागत आहे.

‘करोना’च्या रक्त तपासणीसाठी राज्यात कार्यरत असलेली रूग्णालयांची खोटी यादी काही महाभागांनी व्हायरल केली आहे. मुळात संशयित रुग्णांची ‘करोना’साठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. लोकांमध्ये गैरसमज पसरू नयेत म्हणून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने आता स्पष्टीकरण जारी केले आहे.

‘करोना’ संशतितांच्या तपासणीसाठी रक्ताची गरज नसते. त्या रुग्णाच्या घशाचा द्राव ( ‘नसो फैरिंजीयल स्वाब’ )घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो. यासाठी महाराष्ट्रात सध्या ३ ठिकाणी सुविधा आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात करोनाच्या रुग्णांचे नमुने पाठविले जातात. अजून काही दिवसांत ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई व हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढविण्यात येणार आहेत, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

सोशल मीडियावर करोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची व्हायरल होत असलेली यादी खोटी आहे. करोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचे आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

Breaking : मुंबईतील डान्स बार, पब, डिस्को थेक बंद करण्याचे पोलिसांचे आदेश

Breaking : मंत्रालयातील ‘करोना’ संशयित अधिकाऱ्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी